मनसेचा कंगनाला सज्जड इशारा, मुंबई पोलिसांची भीती वाटत असेल तर…

अमेय खोपकर यांनी ट्विट केले की, "माझ्या मुंबई पोलिसांबद्दल जजमेंटर होऊन कुणीही पंगा घेण्याचा प्रयत्न करु नये. आज मुंबईतल्या आमच्या बहिणी मध्यरात्री कुठल्याही संकोचाशिवाय कामावरुन घरी जातात. मुंबई पोलिसांमुळे मी आज या शहरात सुरक्षित आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत यांनी मुंबई पोलिसांबद्दल एक विधान केलं. त्यानंतर सर्वत्र गदारोळ झाला आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. मनसेचे चित्रपट विभाग अध्यक्ष अमे खोपकर यांनी कंगना रनौत यांना इशारा दिला आहे. (MNS’s strong warning to Kangana) मुंबई पोलिसांबद्दल जे काही बोललं ते खरा मुंबईकर खपवून घेणार नाही असं मनसेने म्हटलं आहे.

अमेय खोपकर यांनी ट्विट केले की, “माझ्या मुंबई पोलिसांबद्दल जजमेंटर होऊन कुणीही पंगा घेण्याचा प्रयत्न करु नये. आज मुंबईतल्या आमच्या बहिणी मध्यरात्री कुठल्याही संकोचाशिवाय कामावरुन घरी जातात. मुंबई पोलिसांमुळे मी आज या शहरात सुरक्षित आहे. कामाचा कितीही ताणतणाव असो, पगार कितीही अनियमित असो, मनुष्यबळ कितीही कमी असो, कितीही पाऊस पडला तरी चालेल. प्रत्येक वेळी मुंबई पोलिसांनी आपल्या धैर्याने सर्वात मोठ्या अडचणींना तोंड दिले आहे.

अमेय पुढे म्हणाले, “जो कोणी माझ्या मुंबई पोलिसांना घाबरतो त्याने त्यांच्या राज्यात जाऊन असुरक्षित रहावे. याचा धोका किंवा सल्ला म्हणून विचार करा. पण मुंबई पोलिसांबद्दल असे काहीही वाईट बरळले तर इतर कोणतेही खरे मुंबईकर सहन करणार नाहीत. ”

संजय राऊत यांनी तिला धमकावल्याचा दावा कंगनाने केला होता, कंगना म्हणाली होती, “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघडपणे धमकी दिली आहे आणि परत मुंबईत येऊ नकोस, असे सांगितले आहे. आधी मुंबईच्या रस्त्यांनी स्वातंत्र्याचा नारा दिला आणि आता उघड धोका आहे. मुंबईला पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके) का वाटते? ” असे कंगना म्हणाली होती.