मंदिर निर्माणाच्या कार्यावर घोटाळ्याचा डाग, स्वतः मोदी आणि भागवतांनी लक्ष घालावे, शिवसेनेची मागणी

राममंदिराच्या निर्माणाचे कार्य सुरु असल्यामुळे त्यासाठी जमीन खरेदी करण्याचे काम सुरू आहे. साठ एकर परिसरात हे मंदिर उभे राहणार असल्यामुळे त्यासाठी जागा संपादित करावी लागत आहे. या जागेच्या व्यवहारादरम्यान जाणीवपूर्वक चढ्या किंमतीला ती खरेदी करण्यात आल्यामुळे संशयाचा धूर निर्माण होत असून त्यात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याची मागणी शिवसेनेनं केलीय. 

    अयोध्येत राममंदिर बांधण्याच्या प्रक्रियेत जमीन खरेदी प्रकरणात झालेला गैरव्यवहार पुढं आल्यामुळं देशभरात खळबळ उडालीय. राममंदिर निर्माणाच्या कार्यात समोर येत असलेला हा घोटाळा संतापजनक असून तमाम हिंदूंच्या मनात संताप निर्माण करणारा असल्याची भावना शिवसेनेनं व्यक्त केलीय.

    राममंदिराच्या निर्माणाचे कार्य सुरु असल्यामुळे त्यासाठी जमीन खरेदी करण्याचे काम सुरू आहे. साठ एकर परिसरात हे मंदिर उभे राहणार असल्यामुळे त्यासाठी जागा संपादित करावी लागत आहे. या जागेच्या व्यवहारादरम्यान जाणीवपूर्वक चढ्या किंमतीला ती खरेदी करण्यात आल्यामुळे संशयाचा धूर निर्माण होत असून त्यात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी लक्ष घालण्याची गरज असल्याची मागणी शिवसेनेनं केलीय.

    १० मिनिटांपूर्वी २ कोटी रुपयांना घेतलेल्या जमिनीचा भाव थेट १८.५ कोटींवर कसा गेला, असा सवाल आपचे नेते संजय सिंह यांनी केला आहे. हा व्यवहार केवळ काही मिनिटांच्या अंतराने झाला. बाबा हरिदास यांनी ही जमीन २ कोटी रुपयांना विकली. सुलतान अन्सारी आणि रवीमोहन तिवारी यांनी ती विकत घेतली. त्यानंतर काही मिनिटांतच राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टला ती जमीन १८ कोटी ५० लाजख रुपयांना विकण्यात आली. केवळ १० मिनिटांत जमिनीचा भाव १६ कोटी ५० लाख रुपयांनी कसा वाढला, असा सवाल विचारला जातोय.

    या व्यवहारातून संशयाचा धूर निघत असून त्याचा कसून तपास करून दोषींना शिक्षा करण्याची मागणी जोर धरतेय.