onion export

कांद्याची निर्यात रोखल्यामुळे राज्यांमधील शेतकरी आक्रमक झाले होते. सर्व शेतकऱ्यांनी सरकारचा तीव्र निषेध केला आहे. रस्त्यावर उतरुन शेतकऱ्यांनी आदोलने केली. शेतकऱ्यांचा रोष पाहता वाणिज्य मंत्रालयाने अडकलेल्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. मात्र नव्याने कांदा निर्यात बंदी कायम असल्याचे सांगितले आहे.

मुंबई : कांदा निर्यातीवर (onion export) निर्बंध लादल्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे. परंतु केंद्र सरकारने (Modi government) बंदरावर अडकून पडलेल्या कांद्याची निर्यात (exported) करण्यास परवानगी दिली आहे. देशातील सीमेवर आणि बंदरावर मोठ्या प्रमाणामध्ये कांदा हा निर्यातीच्या निर्बंधामुळे अडकून पडला (onion stuck at port) होता.

कांद्याची निर्यात रोखल्यामुळे राज्यांमधील शेतकरी आक्रमक झाले होते. सर्व शेतकऱ्यांनी सरकारचा तीव्र निषेध केला आहे. रस्त्यावर उतरुन शेतकऱ्यांनी आदोलने केली. शेतकऱ्यांचा रोष पाहता वाणिज्य मंत्रालयाने अडकलेल्या कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. मात्र नव्याने कांदा निर्यात बंदी कायम असल्याचे सांगितले आहे.

सीमेवर अडकलेल्या कांदा निर्यातीस परवानगी दिली असली तरी अद्याप नव्याने कांदा निर्यातीस परवानगी दिली नाही आहे. निर्यात खुली असल्यामुळे व्यापारी वर्गाचा कांदा मोठ्या प्रमाणात देशांच्या सीमेवर निर्यातीसाठी सज्ज होता. जवळपास २२ ते २५ हजार मेट्रिक टन कांदा बंदरावर अडकला होता. त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घेत या कांद्याला निर्यातीवर निर्बंध उठविले आहेत.

कांद्याचे दर ठरविणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये शेतकरी आणि रयत क्रांती संघटने मोठ्या प्रमाणात आंदोलन करत मंत्र्यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही अशा प्रकारचा इशारा दिला होता. वाणिज्य विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे काही प्रमाणात का होईना व्यापारी आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र नवीन कांदा निर्यातीबाबत कुठल्याही प्रकारचा खुलासा करण्यात आलेला नसल्याने फक्त १४ आणि १५ सप्टेंबर पर्यंत परवानगी मिळालेल्या कांद्याची निर्यात होणार आहे.