#MumbaiRains | सावधान! मुंबई शहर व उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता LIVE | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेट4 महीने पहले

सावधान! मुंबई शहर व उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता LIVE

ऑटो अपडेट
द्वारा- Dnyaneshwar More
कंटेन्ट रायटर
17:07 PMJun 10, 2021

रायगड : पनवेल परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात

15:20 PMJun 10, 2021

15:16 PMJun 10, 2021

सावधान! मुंबई शहर व उपनगरांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता: हवामान विभागाचा अंदाज

09:07 AMJun 10, 2021

09:06 AMJun 10, 2021

08:45 AMJun 10, 2021

मुंबई : हवामान खात्याचा इशारा तंतोतंत खरा ठरवत आज मोसमी पावसाने राज्यात धुवाधार सलामी दिली. मुंबईतही विजांचा लखलखाट, ढगांच्या गडगडाटासह पाऊस ‘वाजतगाजत’ दाखल झाला. मुंबईत पावसाचा जोर इतका मोठा की रुळांवर पाणी साचल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे ठप्प झाली. पश्चिम रेल्वेलाही मुसळधार पावसाचा फटका बसला. रस्ते वाहतूकही कोलमडल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. मुंबईच्या अनेक सखल भागांत पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अगदी पहिल्याच दिवशी

संपूर्ण मुंबईला पावसाने दिला धो धो पछाड !

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने वर्दी दिली होती. हवामान खात्यानेही ९ ते ११ जून या कालावधीत मुसळधार पाऊस होण्याचा इशारा दिला होता. यानुसार मंगळवारपासूनच मुंबईत पावसाला सुरुवात झाली होती. मात्र बुधवारी सकाळपासून मेघगर्जनेसह विजांच्या लखलखाटात मुसळधार सुरू झाल्याने मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडाली. संपूर्ण मुंबईत जोरदार पाऊस सुरू असताना समुद्रालाही मोठी भरती आल्याने पावसाचे पाणी साचण्याचे प्रकार घडले. सकाळी ११.४३ वाजता ४.१६ मीटरची भरती आल्याने प्रचंड उंचीच्या लाटा उसळल्या. मुंबईत ९ जून रोजी आपत्कालीन स्थितीचा धोका सांगणारा अतिदक्षतेचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला होता. त्यामुळे पालिकेसह राज्याचीही आपत्कालीन यंत्रणा सज्ज होती.

पाणी तुंबल्याने मोठी गैरसोय

मुंबईच्या हिंदमाता जंक्शन, शीव रोड नं. २४, शीव ब्रीजच्या खाली, सरदार हॉटेल काळाचौकी, षन्मुखानंद हॉल, माटुंगा, दादर टीटी सर्कल, बीपीटी कॉलनी या ठिकाणी पाणी तुंबल्याचे प्रकार घडले. तसेच पूर्व उपनगरात मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ, कुर्ला गौरीशंकर नगर आणि पश्चिम उपनगरात अंधेरी सब-वे, खार सब-वे, मालाड सब-वे, मीलन सब-वे आदी ठिकाणीही पाणी तुंबले. पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱयांकडून आवश्यक कार्यवाही करण्यात येत होती.

सावधान! पुढील ५ दिवस मुसळधार

९ जूनपासून संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात मान्सून सक्रिय झाला आहे. या ठिकाणी येत्या चार ते पाच दिवसांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागांसाठी सावधानतेचा ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आल्याची माहिती प्रादेशिक हवामान खात्याच्या शुभांगी भुते यांनी दिली.

दरम्यान, मुसळधार पावसाचा इशारा असतानाच उद्या १० जून रोजी सकाळी १२.१७ वाजता समुद्रात ४.२६ मीटरच्या लाटा उसळणार असल्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

९ जूनचा पाऊस

कुलाबा : ४५.६ मिमी (सकाळी ८ ते सायं. ५)

सांताक्रुझ : २२०.६ मिमी (सकाळी ८ ते सायं. ५)

पालिकेच्या यंत्रणेवर नोंदवलेला पाऊस

शहर : १०२.२९ मिमी

पूर्व उपनगर : १६९.१७ मिमी

पश्चिम उपनगर : १३७.३३ मिमी

08:28 AMJun 10, 2021

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत बुधवारी (९ जून) रात्री ११ वाजता ही दुर्घटना घडली. मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात एका ३ मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या १ मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ११ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

08:26 AMJun 10, 2021

या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. तर १८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

08:17 AMJun 10, 2021

मालाड इमारत दुर्घटनेनंतर मुंबई अग्निश्मन दलाकडून मदतकार्य सुरू

08:15 AMJun 10, 2021

मुंबईतील (Mumbai) मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात इमारत कोसळल्याने (Residential Structures) मोठी दुर्घटना घडली आहे.

Load More

मुंबई : मुंबईत आज ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस झाला. हा मान्सूनपूर्व पाऊस होता असे सांगतानाच मान्सून आज, बुधवारी मुंबईत दाखल होत असल्याची माहिती हवामान खात्याच्या संचालक शुभांगी भुते यांनी दिली.

दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबईसह किनारपट्टी भागात पुढील चार दिवस जोरदार पाऊस होऊ शकतो असा अंदाजही हवामान खात्याने व्यक्त केला आहे. मुंबई शहर आणि उपनगरामध्ये पहाटेपासूनच आभाळ दाटून आले होते. त्यानंतर सकाळी गडगडाट सुरू झाला आणि मुसळधार पाऊस कोसळला. हवामान खात्याने येत्या काही दिवसांत अतिवृष्टीचा अंदाज वर्तवल्याने महानगरपालिका प्रशासनही सज्ज झाले आहे.

हवामान खात्याने गेल्या शनिवारीच मान्सून रत्नागिरीच्या हर्णे किनारपट्टी भागात पोहोचल्याचे जाहीर केले होते. परंतु हवामान बदलल्याने मान्सूनचा मुंबईच्या दिशेने वेग मंदावला. आज कुलाबा, महालक्ष्मी आणि दादर भागात 20 मि.मी. ते 40 मि.मी. तर उत्तर मुंबईतील चिंचोली, बोरीवली आणि दहिसर भागात दुपारपर्यंत 60 मि.मी. इतका पाऊस नोंदला गेला. मुंबईसह रायगड, ठाणे, पालघर, पुणे, नाशिक आणि मराठवाडय़ातील काही भागांमध्ये जोरदार वाऱयांसह मुसळधार पाऊस झाला.

एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात

दरम्यान कोरोना रुग्णसेवेसह कोणत्याही स्वरुपाच्या रुग्णसेवेत अडथळे निर्माण होणार नाहीत याची काळजी घेण्याबरोबरच धोकादायक इमारती, दरडग्रस्त भाग आणि लो-लाईन परिसरातील नागरिकांना गरजेनुसार सुरक्षित स्थळी हलवावे अशाही सुचना मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. अतिवृष्टीचा धोका लक्षात घेता एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्या तैनात ठेवत ओएनजीसीसह इतर केंद्रीय संरक्षण संस्थांनाही अतिवृष्टीची माहिती देत सतर्क राहण्यास सांगावे असे त्यांनी सांगितले.

मुंबई महानगरपालिका सज्ज

मुंबईत पुढील चार दिवस अतिवृष्टी होणार असा इशारा दिल्यानंतर मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहन यांनी बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी सांगितले की, यंदा पाणी साचू शकेल अशा ठिकाणी ४७४ पंप बसविले आहेत. तसेच अतिवृष्टीतच्या काळात पूर व्यवस्थापनासाठी कनिष्ठ अभियंत्यांना स्पॉटवर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच हिंदमाता परिसरात दोन मोठे टँक केले असून यात ,साचलेले पाणी वळते करून साठविण्याची व्यवस्था केली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याातील पोलीस स्थानिक भागात अडचणी निर्माण झाल्यास मदतीला येतील. तसेच प्रत्येक वॉर्डात मनपाच्या ५ शाळा तयार ठेवल्या असून गरज लागल्यास लोकांना तिथे स्थलांतरित केले जाईल.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
२५ शनिवार
शनिवार, सप्टेंबर २५, २०२१

राजकीय पक्षांची 'हायकमांड संस्कृती' ही पक्षांनाच मारक ठरते आहे, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.