मान्सून हंगाम संपला! परतीचा पाऊस कधीपासून सुरु होणार? : जाणून घ्या एका क्लिकवर

आता परतीच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या परतीच्या मान्सूनविषयी हवामान विभाग दिल्लीचे तज्ज्ञ के. एस. होसळीकर यांनी माहिती दिली आहे.

    मुंबई : सध्या मुसळधार पावसानं सगळीकडे हाहाकार माजवला आहे. यातच आता यंदाचा मान्सून हंगाम 30 सप्टेंबरला संपला आहे. आता परतीच्या पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या परतीच्या मान्सूनविषयी हवामान विभाग दिल्लीचे तज्ज्ञ के. एस. होसळीकर यांनी माहिती दिली आहे.

    दरम्यान मान्सूनचा परतीचा पाऊस वायव्य भारतातील काही भागांतून येत्या 6 ऑक्टोबरला सुरू होणार आहे. दरवर्षी मान्सून 17 सप्टेंबरच्या सुमारास निघतो. मात्र यंदा 6 ऑक्टोबरपासून तो सुरु होत आहे. महाराष्ट्रात पोहचता त्याला 12 ऑक्टोबर उजाडणार आहे. मान्सून ब्रेक झाल्यानं परतीचा पाऊस महिनाभर लांबणीवर गेला आहे. त्यामुळे यंदा 6 ऑक्टोबरपासून परतीचा पाऊस सुरु होईल. यातच पावसाच्या हंगामात चांगल्या प्रमाणात पाऊस झाल्याचं भारतीय हवामान खात्यानं म्हटलं आहे.

    दरम्यान, आता शाहीन चक्रीवादळाचा फटका गुजरात आणि महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याला बसण्याची शक्यता आहे. शाहिन चक्रीवादळामुळे आता हवामान खात्याचे वरिष्ठ शास्त्रज्ञ आर. के. जेनमानी यांनी म्हटलं की, 3 ऑक्टोबरपर्यंत ही स्थिती कायम राहिल.