Monsoon Session Live BJP's Abhirup Assembly to protest the suspension of 12 MLAs nrpd | Monsoon Session Live Day 2 : १२ आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ भाजपाची अभिरूप विधानसभा | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेटJuly, 06 2021

Monsoon Session Live Day 2 : १२ आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ भाजपाची अभिरूप विधानसभा

द्वारा- Navarashtra Staff
द्वारा- Prajakta Dhekale
डिजिटल कंटेन्ट रायटर
17:26 PMJul 06, 2021

काल जे काही घडलं, हे महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

काल जे काही घडलं, हे कितीही कुणी काही म्हटलं तरी महाराष्ट्राच्या परंपरेला लाजिरवाणं होतं. ही आपली संस्कृती नाही, ही आपली परंपरा नाही. हल्ली जे काही चाललेलं आहे. ते बघितल्यांतर एकूण कामकाजाचा दर्जा हा उंचावण्याकडे आपला कल आहे, की खालवण्याकडे आहे? असा प्रश्न पडतो. पण मी नक्कीच म्हणेन की दर्जा खालावत चाललेला आहे.” असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलं.

15:56 PMJul 06, 2021

राज्य सरकार केंद्रातील कृषी कायद्याला विरोध करणारे विधेयक सादर

 जीवनावश्यक वस्तू सुधारणा अधिनियम २०२१. शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण  आश्वसित किंमत आणि शेतीसेवा विषयम करार महाराष्ट्र सुधारणा विधेयक २०२१ , शेतकरी उत्पादनाचे व्यापार आणि व्यवहार (प्रोत्साहन आणि सुविधा) अधिनियम २०२०

15:00 PMJul 06, 2021

विविध विभागातील १५ हजार ५०१ रिक्तपद भरण्यास अर्थ विभागाची मंजुरी, उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी  राज्यातील विविध विभागातील १५ हजार ५०१ रिक्त पद भरण्यास अर्थ विभागानं मंजुरी दिली असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पावसाळी अधिवेशनाच्या दुसरी दिवशी सभागृहात बोलताना केली.

14:45 PMJul 06, 2021

माईक काढून घेणे, ही महाराष्ट्रातली आणीबाणी आहे- देवेंद्र फडणवीस

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात विरोधी पक्ष नेत्यांनी सुरु केलेल्या अभिरूप विधानसभेतील माईक काढून घेण्यात आले आहे. त्यानंतर लोकशाहीत विरोधी पक्ष आणि माध्यमांना कुलुप लावण्याचं काम ठाकरे सरकारने केलं आहे, ही राज्यातील आणीबाणी असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. 

12:24 PMJul 06, 2021

अभिरूप विधानसभेवर कारवाई ;स्पीकर , वाटणाऱ्यावरही कारवाई करण्याचे सभागृह अध्यक्षाचे आदेश

 भाजपच्या प्रतिविधानसभेवर भास्कर जाधव यांनी सभागृहात आवाज उठवत प्रतिविधानसभा घेण्यास परवानगी दिली आहे का?, तिथे कागद वाटले जात आहेत. स्पीकर लावण्यास परवानगी दिलीये का? आदी मुद्दे त्यांनी उपस्थित केले. भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानंतर मलिक यांनी पाठिंबा देत काही विषय मांडले. अधिकार नसताना माजी आमदार यात कसे सहभागी होत आहे. काल झालेल्या गदारोळावेळी आम्ही मार्शलला बोलवले , पण कुणीही आले  नाही. या सभागृहाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याला जाब विचारावा, अशी मागणी मलिक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्याचप्रमाणे भास्कर जाधव यांना संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली. त्यावर अध्यक्षांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले. स्पीकर वापरण्यासंदर्भात परवानगी दिलेली नाही. तसेच बाहेर जे बोलले  जात आहे, तेही तपासून घेतले जाईल, तसेच प्रतिविधान सभेत पत्रक वाटणाऱ्यावरही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत . 

11:49 AMJul 06, 2021

खोट्या आरोपाखाली आमदारांना निलंबित केले जातेय; फडणवीसांनी व्यक्त केला संताप

आमदारांच्या  निलंबनाप्रकरणी भाजपने  ठाकरे सरकार हाय हायच्या....   घोषणा दिल्या. खोट्या आरोपाखाली आमदारांना निलंबित केले जात आहे. 'शेतकरी, ओबीसी, मराठा, मागासवर्गीय, विद्यार्थी, एमपीएससी, विम्याचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांवर आवाज उठवला म्हणून  मदारांना निलंबित केले  जातेय असा आरोप  देवेंद्र फडणवीस यांनी  केले आहे.

सभागृहात गैरवर्तन केल्या प्रकरणी भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ आक्रमक झालेल्या भाजपाने आज आंदोलन सुरू केलं आहे.  सुरूवातीला विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आमदारांनी आंदोलन केलं. त्यानंतर सभागृहाबाहेरचं भाजपाने प्रतिविधानसभा भरवली. भाजपाचे आमदार कालिदास कोळंबकर यांना प्रतिविधानसभेच्या अध्यक्षपदी बसवण्यात आलं आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
२४ शनिवार
शनिवार, जुलै २४, २०२१

एखादी खासगी कंपनी कंत्राटदार म्हणून अशोकचक्राचा वापर करते असं करणं योग्य आहे, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.