राज्यात मागील तीन महिन्यात अधिक मृत्यू, मृतांचा आकडा १ लाखांच्या पार

मुंबईत आज ही 16 हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील 1600 रुग्ण आयसीयू मध्ये तर 1 हजार रुग्ण व्हेंटिलेटर वर आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरली तरी रुग्ण संख्या कमी ज़ालेली नाही. दररोज 500 ते 800 च्या दरम्यान नवे रुग्ण सापडत आहेत. यामुळेच मुंबई सारख्या शहरात सरासरी 25 च्या आसपास रुग्ण दगावतात. हीच परीस्थिती राज्यातील इतर शहरांमध्ये आहे.

  मुंबई : राज्याने मृतांचा 1 लाखांचा टप्पा पार केला. यातील 50 % मृत्यू हे केवळ मागील तीन महिन्यात नोंदवण्यात आले. त्यामुळे दुसऱ्या लाटेत मृत्यू अधिक झाले असल्याचे समोर आले आहे. याशिवाय मॄत्युदर ही वाढला असल्याचे समोर आले आहे.

  कोरोनाची दुसरी लाट ओसरली तरी मृत्यू मात्र वाढत असल्याचे दिसते. राज्यातील मृतांचा एकूण आकडा 1 लाख 06 हजार 367 वर पोहोचला आहे. यातील 57 हजार मृत्यू हे दुसऱ्या लाटेत मागील तीन महिन्यात झाले असल्याचे समोर आले आहे.

  राज्यात पहिल्या लाटेत 19 लाख कोरोना बाधित रुग्ण होते. त्यात साधारणता 49 हजार रुग्णांचे मृत्यू झाले. दुसऱ्या लाटेत मात्र कोरोना बाधित रुग्णांची संख्या दुपटीने वाढली. दुसऱ्या लाटेत केवळ तीन महिन्यात 40 लाख लोकांना कोरोना संसर्गाची बाधा झाली. त्यात साधारणता 57 हजार रुग्णांचा मृत्यू झाला.

  मुंबईत आज ही 16 हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील 1600 रुग्ण आयसीयू मध्ये तर 1 हजार रुग्ण व्हेंटिलेटर वर आहेत. कोरोनाची दुसरी लाट ओसरली तरी रुग्ण संख्या कमी ज़ालेली नाही. दररोज 500 ते 800 च्या दरम्यान नवे रुग्ण सापडत आहेत. यामुळेच मुंबई सारख्या शहरात सरासरी 25 च्या आसपास रुग्ण दगावतात. हीच परीस्थिती राज्यातील इतर शहरांमध्ये आहे.

  राज्यात दररोज सरासरी 400 ते 450 रुग्ण दगावतात. याशिवाय दररोज 1500 जुन्या रुग्णांची नोंद केली जाते. त्यामुळे राज्यातील मृत्युदरात वाढ झाली असून महिन्याभरापूर्वी 1.49 असलेला मृत्युदर 1.81 % वर पोचला आहे. पुढील महिनाभर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून मृत्युदर आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  दुसऱ्या लाटेत कोरोना बाधित रुग्णांची संख्या पहिल्या लाटेपेक्षा खूपच अधिक होती. त्यामुळे रुग्णांना आयसीयू तसेच व्हेंटिलेटरची गरज अधिक भासली. अशा रुग्णांना बरे झाल्यानंतर ही निदान 100 दिवस निरीक्षणाखाली ठेवावे लागते मात्र ते शक्य झाले नसल्याचे मृत्यू परीक्षण समितीचे प्रमुख डॉ अविनाश सुपे यांनी सांगितले. अनेक रुग्ण बरे होऊन घरी गेल्यानंतर दगावलेअसल्याचे बोलले जात आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर एक ते दिड महिन्यांतर ही रुग्ण दगावल्याचे समोर आले आहे.यामुळे देखील मृतांचा आकडा वाढल्याचे डॉ सुपे म्हणाले.

  कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी आज ही दररोज 40 तर 50 हजार नवे रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे सक्रीय रुग्णांचा आकडा ही मोठा असल्याचे दिसते. अनेक रुग्णांना आयसीयू आणि व्हेंटिलेटरची गरज भासते. जो पर्यंत दैनंदिन रुग्ण संख्या कमी होत नाही तोपर्यंत मृत्युदर कमी होणार नाही. पुढील महिनाभर मृतांचा आकडा वाढणार असल्याचा अंदाज ही डॉ सुपे यांनी व्यक्त केला.

  मृत्यूचा चढता आलेख 

  दिनांक                       मृत्यू

  17 ऑगस्ट 2020  –  20,265

  11 ऑक्टोबर 2020- 40,349

  10 जानेवारी 2021 – 50,061

  18 एप्रिल 2021     – 60,473

  02 मे 2021           – 70,284

  15 मे 2021           – 80,512

  25 मे 2021           – 90,349

  6 जून 2021          – 1,00,130

  12 जून 2021 – 1,08,333