महाराष्ट्रात कोविन ऍपवर १ लाखांहून अधिक जणांची डुप्लिकेट नोंदणी, एकाच नावाने अनेकदा रजिस्ट्रेशन, यंत्रणेसमोर डोकेदुखी

वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करता यावेत आणि काहीही करून दुसरी  लस मिळावी, यासाठी अनेकांनी मोबाईल नंबर बदलून एकाच नावाची नोंदणी केल्याची बाब आता समोर येतेय. लस मिळत नसल्यामुळे अशा प्रयत्नांनी लस मिळवण्याची तयारी नागरिकांनी केल्याचं यातून दिसतंय. अशा प्रकारची रजिस्ट्रेशन्स आता काढून टाकण्याचं काम सुरू असून नागरिकांनी एका व्यक्तीसाठी एकाहून अधिक रजिस्ट्रेशन्स करू नयेत, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय. 

    देशात कोरोनावरील लसीसाठी लसीकरण सुरु झाल्यानंतर कोविन ऍपवर त्याची नोंदणी करताना नाव, आधार नंबर आणि मोबाईल क्रमांक द्यावा लागतो. देशभरात १ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांसाठी लसीकरणाला सुरुवात झाली. मात्र प्रत्यक्षात लसीच उपलब्ध नसल्याने अनेकांना या ऍपवर लसींसाठी स्लॉटच मिळत नसल्याचं चित्र होतं. त्यात पहिली लस घेतलेल्या अनेकांनी दुसरी लस मिळावी, यासाठी नवे मोबाईल नंबर वापरून पुन्हा रजिस्ट्रेशन केल्याचं दिसून आलंय.

    वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करता यावेत आणि काहीही करून दुसरी  लस मिळावी, यासाठी अनेकांनी मोबाईल नंबर बदलून एकाच नावाची नोंदणी केल्याची बाब आता समोर येतेय. लस मिळत नसल्यामुळे अशा प्रयत्नांनी लस मिळवण्याची तयारी नागरिकांनी केल्याचं यातून दिसतंय. अशा प्रकारची रजिस्ट्रेशन्स आता काढून टाकण्याचं काम सुरू असून नागरिकांनी एका व्यक्तीसाठी एकाहून अधिक रजिस्ट्रेशन्स करू नयेत, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय.

    १ मे पासून १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची घोषणा करण्यात आली आणि या लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारांवर देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात लसीच उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं. विशेषतः ज्यांना पहिली लस मिळाली, त्यांनी दुसऱ्या लसीसाठी ४८ दिवस वाट पाहण्याऐवजी नवा मोबाईल नंबर वापरून पुन्हा पहिल्या लसीसाठीच रजिस्ट्रेशन केल्याचं दिसू आलंय.

    इतर राज्यांतही असे प्रकार झाले असण्याची शक्यता आहे. मात्र त्याबाबतची आकडेवारी अजून समोर आलेली नाही.