प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयानी मागील पाच वर्षात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून घेतलेली तब्बल 100 कोटींहून अधिक रक्कम विद्यार्थ्यांना परत न करता अडवून ठेवली असल्याचे उजेडात आले असून त्यात राज्यातील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. ही खळबळजनक माहिती अमर एकाड यांनी माहिती अधिकारात मिळवली आहे.

  मुंबई (Mumbai).  राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयानी मागील पाच वर्षात प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून घेतलेली तब्बल 100 कोटींहून अधिक रक्कम विद्यार्थ्यांना परत न करता अडवून ठेवली असल्याचे उजेडात आले असून त्यात राज्यातील नामांकित वैद्यकीय महाविद्यालयांचा समावेश आहे. ही खळबळजनक माहिती अमर एकाड यांनी माहिती अधिकारात मिळवली आहे.

  राज्यातील खाजगी वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस, बीडीएस, बीएचएमएस, आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान प्रत्येक विद्यार्थ्यांकडून वसतिगृह आणि मेस फी, शैक्षणिक साहित्य, वह्या, पुस्तके, दप्तर, वैद्यकीय सुविधा आदींसाठी अनामत रक्कम घेतली जाते. मात्र ही रक्कम संबंधित विद्यार्थ्यानी शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना ती परत देणे बंधनकारक असताना राज्यातील बहुतांश वैद्यकीय महाविद्यालयांनी ती परत दिलीच नाही़ दरम्यान, यासोबतच राज्यात पारंपारिक अभ्यासक्रम शिकवणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयांनी ही तब्बल 500 कोटी रुपयांचा निधी अडवून ठेवला असल्याची माहिती समोर आली होती.

  राज्यात 2015 ते 2020 या कालावधीत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये एमबीबीएस साठी 2 हजार 120, बीडीएस प्रवेशासाठी 2 हजार 350 आणि बीएचएमएससाठी 3 हजार 860 जागा उपलब्ध होत्या. यामध्ये बीडीएस 145 जागा व बीएचएमएस 844 जागा शिल्लक राहिल्या होत्या, अशी माहिती आपल्याला विभागाकडून देण्यात आल्याचे अमर एकाड यांनी सांगितले.

  ‘या’ महाविद्यालयांचा समावेश
  – मीर वैद्यकीय महाविद्यालय, तळेगाव दाभाडे – 1 लाख 95 हजार
  – एस बी एम टी वैद्यकीय महाविद्यालय, नाशिक – 2 लाख
  – ए सी पी एम वैद्यकीय महाविद्यालय, धुळे – 1 लाख 70 हजार
  – महात्मा गांधी दंत महाविद्यालय, नवी मुंबई – 1 लाख
  – डॉ.पंजाबराव वैद्यकीय महाविद्यालय, अमरावती – 2 लाख
  – अश्विनी वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर – 1 लाख 75 हजार
  – साळवे वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर 1 लाख 75 हजार