Mumbai Corona Update: २३ हजारांहून जास्त मुंबईकरांना लस घेतल्यानंतरही कोरोना झाल; रुगणांची वाढती आकडेवारी धडकी भरवणारी

मुंबईत २३२३९ लसवंतांना लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाली आहे. त्यातही दोन्ही डोस घेऊनही बाधा झालेल्यांची संख्या ९००० पेक्षा जास्त आहे. तर पहिला डोस घेतल्यानंतर बाधीतांची रूग्णसंख्या १४२३९ आहे. मुख्य म्हणजे, लस घेऊनही कोरोनाची लागण होण्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरीकांचा सर्वाधिक समावेश आहे

  मुंबई : राज्यात कोरोनाचा धोका कमी करण्यासाठी राज्य सरकारने सावध पावले टाकण्याचे ठरविले आहे. त्यामुळेच रेल्वे प्रवासाला दोन लसीच्या मात्र घेतलेल्यांनाच प्रवेश देण्याचे धोरण सरकारने घेतले आहे. मात्र त्यानंतरही कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मुंबईत दररोज कोरोनाचे रूग्ण सापडण्याचे प्रमाण आटोक्यात असले तरी सरकार आणि जनतेसाठी धक्कादायक बाब ही आहे की, यामध्ये मोठ्या प्रमाणात लस घेतलेल्या व्यक्तींच कोरोनाची शिकार होत असल्याचे समोर येत आहे. आरोग्य विभागातील सूत्रानी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईमध्ये २३ हजारांहून जास्त कोरोना रुग्ण असे सापडले आहेत ज्यांनी लस घेतल्यानंतरही त्यांना कोरोनाची बाधा झाली आहे.

  ६० वर्षांवरील ज्येष्ठांचा सर्वाधिक समावेश

  मुंबईत २३२३९ लसवंतांना लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झाली आहे. त्यातही दोन्ही डोस घेऊनही बाधा झालेल्यांची संख्या ९००० पेक्षा जास्त आहे. तर पहिला डोस घेतल्यानंतर बाधीतांची रूग्णसंख्या १४२३९ आहे. मुख्य म्हणजे, लस घेऊनही कोरोनाची लागण होण्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरीकांचा सर्वाधिक समावेश आहे

  ज्येष्ठ नागरीकांना सर्वाधिक धोका

  याबाबत १४ते ४५ वयोगटात पहिला डोस घेऊन कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची संख्या ४४२० आहे. तर दुसरा डोस घेऊनही लागण झालेले १८३५ आढळून आले आहेत. ४५ ते ६० या वयोगटात पहिला डोस घेऊन कोरोनाची लागण झालेले रुग्ण ४८१५ तर
  दुसरा डोस घेऊन कोरोनाची लागण झालेले रूग्ण २६८७ आहेत. या शिवाय साठ वयोमर्यादे वरील पहिला डोस घेऊन कोरोनाची लागण झालेले रुग्ण ५००४ तर दुसरा डोस घेऊन कोरोनाची लागण झालेले रुग्ण ४४७९ आहेत.

  लस न घेणा-या ९३टक्के रुग्णांचा मृत्यू

  या शिवाय या पाहणीत असे दिसून आले आहे की, सहा महिन्यांमध्ये एकंही लस न घेतलेल्यामध्ये दोन तृतीयांश लोकांना अतिदक्षता विभागात भरती करण्याची वेळ आल असून त्यात ९३ टक्के म्हणजेच५७६ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. लस घेतलेल्या आणि लस न घेतलेल्या व्यक्तींच्या मृत्यूच्या प्रमाणाबाबत केलेल्या अभ्यासात ही बाब उघड झाल्याने लस घेतल्यानंतरही बाधा होत असल्याचे स्पष्ट होतानाच लस घेतल्याने प्राण वाचल्याचेही स्पष्ट झाले आहे असे आरोग्य विभागातील सूत्रांचे मत आहे त्यांनी सांगितले की, एकही लस न घेतलेल्या व्यक्तीचे प्रमाण ९३.०५ टक्के आहे तर एक लस घेतलेल्या व्यक्ती ५.९७ टक्के आहेत या शिवाय दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तीचे प्रमाण ०.९६ टक्के आहे.