एका हॉटेलात आढळला मोहन डेलकर यांचा मृतदेह ; आत्महत्या केल्याचा संशय

सोमवारी मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह (Marine Drive) स्थित एका हॉटेलच्या खोलीत मोहन डेलवर यांचा मृतदेह आढळून आला. प्रकरण समोर येताच घटनास्थळी मुंबई पोलीस (Mumbai Police) दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

    मुंबई : खासदार मोहन डेलकर (Dadra and Nagar Haveli MP Mohan Delkar) यांचा दक्षिण मुंबई (South Mumbai) तील एका हॉटेलात (Hotel) मृतदेह आढळला आहे. मोहन डेलकर दमन आणि दिवचे खासदार आहेत. सोमवारी मुंबईतल्या मरीन ड्राइव्ह (Marine Drive) स्थित एका हॉटेलच्या खोलीत मोहन डेलवर यांचा मृतदेह आढळून आला. प्रकरण समोर येताच घटनास्थळी मुंबई पोलीस (Mumbai Police) दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात हे आत्महत्येचा प्रकार असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, अद्याप पोलिसांनी या गोष्टीला दुजोरा दिलेला नाही. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून त्यांच्या मुंबई भेटीबाबतही सविस्तर माहिती घेत आहेत.

    दादरा आणि नगर हवेली लोकसभा क्षेत्रातून अपक्ष म्हणून निवडून आलेले खासदार मोहन डेलकर ५८ वर्षांचे होते. ते १९८९मध्ये प्रथम खासदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर सातत्याने ते खासदार म्हणून निवडून येत होते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविली होती.