Dadra Nagar Haveli MP Mohan Sanjibhai Delkar's suicide note names Gujarat officials and former ministers

    मुंबई : दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन संजीभाई डेलकर (५९) यांनी(mohan delkar death) काही दिवसांपुर्वी मरिन ड्राइव्ह येथील सी ग्रीन साउथ हॉटेलच्या रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अखेर मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या प्ररकरणी एफआयआर (FIR) दाखल केला आहे. मरीन ड्राइव्ह पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. मोहन डेलकर यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त करण्यात आले होते, असं या एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

    मोहन डेलकर हे अपक्ष खासदार म्हणून दादरा नगरहवेली मतदासंघातून लोकसभेवर निवडून गेलेले होते. २२ फेब्रुवारी रोजी मुंबईतील हॉटेल सी ग्रीनमध्ये खासदार मोहन डेलकर यांनी आत्महत्या केली होती.घटनास्थळावरून पोलिसांना १५ पानांची एक सुसाइड नोट सापडली होती. सुसाईड नोटमध्ये पोलीस, प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत भाजपचे नेते व गुजरातचे माजी गृहमंत्री व दादरा नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचे नाव होते.

    मंगळवारी शिवसेना आमदारांनी खासदार मोहन डेलकरांच्या आत्महत्येचा मुद्दा उपस्थित करत सभागृहात गोंधळ घातला. खासदार मोहन डेलकरांच्या आत्महत्येप्रकरणी कुणाला अटक का झाली नाही? त्यांच्या आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत असलेल्या सर्वांना अटक व्हायला हवी अशी मागणी करत परिवहनमंत्री अनिल परब आणि सत्ताधारी आमदारांनी गोंधळ घातला. या सर्व गोंधळानंतर गृहमंत्र्यांनी डेलकर यांच्या प्रकरणाचा एसआयटी तपास करणार असल्याची घोषणा केली.