जात प्रमाणपात्राबाबतच्या उच्च न्यायालयाच्या निर्णया विरोधात खासदार नवनीत राणा यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

२०१४ साली नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्य तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी चारवेळा खासदारकीची टर्म भूषविलेले शिवसेनेचे हेविवेट नेते आनंदराव अडसूळ यांच्याशी दोन हात केले. मात्र, या निवडणुकीत नवनीत राणा पराभूत झाल्या. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढताना नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा३६००० मतांनी पराभव केला.

    मुंबई: अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने रद्द केलं आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांना धक्का बसला आहे. इतकंच नाही तर खासदार नवनीत राणा यांना न्यायालयाने दोन लाखांचा दंड ठोठावला आहे. हायकोर्टाच्या या निर्णयाविरोधात आणि आपली खासदारकी वाचवण्यासाठी नवनीत राणा यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्याची माहिती मिळतेय.

    शिवसेना नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठानं हा निकाल दिला आहे. नवनीत राणा यांना हायकोर्टानं २ लाखांचा दंडदेखील सुनावला आहे. नवनीत राणा यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आनंदराव अडसूळ यांचा अमरावती लोकसभा मतदारसंघातून पराभव केला होता. दरम्यान,उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात आता नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

    कोण आहेत नवनीत राणा?

    नवनीत राणा यांचा जन्म ३जानेवारी १९८६ रोजी मुंबईत झाला. त्यांनी तेलुगू, पंजाबी, हिंदी आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत काम केले आहे. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी नवनीत राणा या मॉडेलिंग करायच्या. मात्र, २०११ साली रवी राणा यांच्याशी लग्न झाल्यानंतर नवनीत राणा यांनी चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली होती. नवनीत राणा यांचा विवाहसोहळाही चर्चेचा विषय ठरला होता. ३१०० जोडप्यांसह त्यांनी सामूहिक विवाहसोहळ्यात नवनीत राणा यांच्याशी लग्नगाठ बांधली होती. या विवाहसोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज व्यक्ती उपस्थित होत्या.

    नवनीत राणा यांचे लग्न झाले तेव्हा रवी राणा हे अमरावतीच्या बाडनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. २०१४ साली नवनीत राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्य तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी चारवेळा खासदारकीची टर्म भूषविलेले शिवसेनेचे हेविवेट नेते आनंदराव अडसूळ यांच्याशी दोन हात केले. मात्र, या निवडणुकीत नवनीत राणा पराभूत झाल्या. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत स्वतंत्रपणे लढताना नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांचा३६००० मतांनी पराभव केला.