महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काम करत आहेत त्या पद्दतीने देशाला काम करावं लागेल : खासदार संजय राऊत

मुंबईत रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २४ तास काम करत आहेत. प्रत्येक गावात, घरात काय सुरु आहे त्याची माहिती घेत आहेत. महाराष्ट्रात लवकरच परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकार आणि प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती ताकद लावून काम करत आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

    मुंबई : संपूर्ण देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. परंतु महाराष्ट्रात लवकरच परिस्थिती नियंत्रणात येईल, असा विश्वास शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काम करत आहेत त्या पद्दतीने देशाला काम करावं लागेल असं प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले.

    काय म्हणाले संजय राऊत ?

    मुंबईत रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २४ तास काम करत आहेत. प्रत्येक गावात, घरात काय सुरु आहे त्याची माहिती घेत आहेत. महाराष्ट्रात लवकरच परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. राज्य सरकार आणि प्रशासनातील प्रत्येक व्यक्ती ताकद लावून काम करत आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं.

    पुढे म्हणाले की,  देशातील स्थिती गंभीर आहे, काही राज्यांनी सुरुवातीपासून चाचण्या केल्या नाहीत . अचानक लाटा उसल्यामुळे उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल येथून आकडेवारी यायला लागली आहे. पण मुंबईसारख्या मोठ्या शहारत संख्या निम्य्यावर आली आहे. कारण महाराष्ट्रात प्रशासन, राज्य सरकार, स्वत: मुख्यमंत्री सूत्र आपल्या हातात घेऊन गाव पातळीवरही यंत्रणा राबवली जात आहे की नाही हे पाहत आहेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत.