बुरा न मानो.. होली है…! खासदार संजय राऊतांचं ट्रेडमार्क स्टाईलमध्ये ट्विट

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अजून एक हल्ला त्यांनी होळीच्या निमित्ताने केला आहे.  या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी आपल्या ट्रेडमार्क स्टाईलचा वापर केला आहे. त्यांनी एक शेर ट्विट केला आहे. 'आसमान मे उडने की मनाही नही है…. बस शर्त इतनी है की जमीन को नजर अंदाज ना करे', अशा मजकूर त्यामध्ये आहे.

    मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेटरबॉम्ब प्रकरणानंतर दिल्लीतून सातत्याने पत्रकार परिषदांच्या माध्यमातून भाजपवर हल्ला करत होते. आता अजून एक हल्ला त्यांनी होळीच्या निमित्ताने केला आहे.  या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी आपल्या ट्रेडमार्क स्टाईलचा वापर केला आहे. त्यांनी एक शेर ट्विट केला आहे. ‘आसमान मे उडने की मनाही नही है…. बस शर्त इतनी है की जमीन को नजर अंदाज ना करे’, अशा मजकूर त्यामध्ये आहे.

    परंतु आता संजय राऊत यांचा हा इशारा नेमका कोणासाठी आहे, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सध्या फोन टॅपिंग आणि परमबीर सिंह यांच्या पत्रावरून संजय राऊत भाजपच्या आरोपांना तोडीस तोड प्रत्युत्तर देत आहेत. तर दुसरीकडे संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (UPA) अध्यक्षपदावरून संजय राऊत महाविकासआघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसशीही दोन हात करत आहेत.

    तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी महाविकासआघाडीच्या नेत्यांनाही आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे वास्तवाकडे दुर्लक्ष करु नका, अशा आशयचा राऊतांचा हा संदेश नेमका कोणासाठी आहे, हा प्रश्न अनेकांना पडला आहे.