अध्यक्षपदाचा विषय लवकर मार्गी लावावा, खासदार संजय राऊत यांचा काँग्रेसला मोठा सल्ला

कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून महत्त्वाची मागणी केली असतानाच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला मोठा सल्ला दिला आहे. नेतृत्वहीन झालेल्या काँग्रेसचा भारतीय जनता पार्टी फायदा घेत असून, अध्यक्षपदाचा विषय लवकर मार्गी लावावा, असे म्हटले आहे.

    मुंबई: पंजाबमध्ये काँग्रेसचा (Congress) मोठा भूकंप झाला आहे. एकीकडे पंजाबसह अन्य राजांच्या निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. परंतु काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या कलहामुळे पक्षाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे राजकीय वातावरणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, अध्यक्षपदाचा विषय लवकर मार्गी लावावा, असा मोठा सल्ला खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला दिला आहे.

    शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधताना हा सल्ला दिला. कपिल सिब्बल आणि गुलाम नबी आझाद या ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून महत्त्वाची मागणी केली असतानाच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसला मोठा सल्ला दिला आहे. नेतृत्वहीन झालेल्या काँग्रेसचा भारतीय जनता पार्टी फायदा घेत असून, अध्यक्षपदाचा विषय लवकर मार्गी लावावा, असे म्हटले आहे.

    काँग्रेसला अध्यक्ष हवा की, नको हा त्यांचा पक्षांतर्गत मुद्दा आहे. मात्र, काँग्रेस पक्ष देशातील सगळ्यात जुना पक्ष आहे. काँग्रेसने स्वातंत्र्यलढ्यात मोलाचे योगदान दिले आहे. ६० वर्षांपेक्षा जास्त काळ देशावर राज्य केले आहे. अनेक मोठे नेते दिले आहेत. अशा वेळी काँग्रेस पक्षाला अध्यक्ष नसणे याविषयी लोकांच्या मनात नक्कीच संभ्रम निर्माण होतो. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.