‘राऊतांच्या दंडात ताकद आहे का?’ संजय राऊत म्हणतात ‘आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्हीही असतो’

'दंडात ताकद आहे का?' चंद्रकाांत पाटील यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना “आमच्या दंडाशी बरोबरी करू नका, आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्ही ही असतो.”  असा इशारा दिला आहे.

    मुंबई – एकेकाळचे ‘पक्के मित्र’ असलेले शिवसेना भाजप हे दोन पक्ष आता ‘पक्के’ शत्रु झाले आहेत. मागील काही दिवसांपासुन या दोन पक्षांत चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. औरंगाबाद दौऱ्यावर असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘राऊतांच्या दंडात ताकद आहे का?’ असा सवाल विचारला होता.

    चंद्रकांत पाटील यांच्या याच प्रश्नाला उत्तर देताना शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत म्हणाले की, “शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला, इतिहास समजून घ्या. आमच्या दंडाशी बरोबरी करू नका, आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्ही ही असतो.”  त्यामुळे राऊत यांच्या विधानाने आता नवा वाद होण्याची शक्यता आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    संजय राऊत यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर टीका केल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. या आरोपांना संजय राऊत उत्तर देत होते. “मी टीका केली नाही. तुम्हाला तसं वाटत असेल त आताच अटक करा.” असं थेट आव्हानच राऊत यांनी भाजपलं दिलं.

    तर, दंडात ताकद आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना “आमच्या दंडाशी बरोबरी करू नका, आमच्याकडे दंड आणि दांडा दोन्ही ही असतो.”  असा इशारा दिला आहे.