देवेंद्र फडणवीस हे पंतप्रधान मोदींपेक्षा मोठे झाले आहे, खासदार संजय राऊतांचा सणसणीत टोला

मुळात देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी पाळत नाही. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मोठे नेते झाले आहे, असं वाटत आहे. वारंवार राजीनाम्याची मागणी करत असल्यामुळे त्यांचं हसं होत आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.

    मुंबई : मुंबईत पत्रकारांशी बोलत असताना परमबीर सिंग यांच्या पत्रावरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh Letter) यांच्या पत्रामुळे महाविकास आघाडी सरकार (MVA Goverment) आणि भाजप (BJP) यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी पाळत नाही. ते नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मोठे नेते झाले आहे असे वाटत आहे, असा सणसणीत टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला आहे.

    मुळात देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी पाळत नाही. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा मोठे नेते झाले आहे, असं वाटत आहे. वारंवार राजीनाम्याची मागणी करत असल्यामुळे त्यांचं हसं होत आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.परमवीर सिंग यांनी जे काही आरोप केले आहे, त्या प्रकरणाची सेवानिवृत्त न्यायाधीश मार्फत चौकशी केली जाणार आहे. जेव्हा सेवानिवृत्त न्यायाधीश यांनी चौकशी केली तर पदावरून दूर होण्याची गरज नसते, असंही राऊत यांनी सांगितलं.