खासदार उदयनराजे भोसले शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल…

आज सकाळपासून पुन्हा सिल्व्हर ओकवरील घडामोडींना वेग आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार काही वेळापूर्वीच याठिकाणी आले होते. ते आता सिल्व्हर ओकवरून बाहेर पडले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत.

    मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर शरद पवार यांचे विश्वासू दिलीप वळसे पाटील यांच्याकडे मंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. देशमुखांच्या राजीनाम्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडींना वेग आला आहे. आज सकाळी नूतन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवारांची भेट घेतली. तर आता भाजपचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले पवारांच्या भेटीसाठी सिल्वर ओकवर दाखल झाले आहेत. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

    मात्र, उदयनराजे भोसले याठिकाणी शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आल्याचे स्पष्ट झाले. काही दिवसांपूर्वीच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्यावर लवकरच आणखी एक शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे सध्या शरद पवार सिल्व्हर ओकवर आराम करत आहेत.

    दरम्यांन परमबीर सिंग यांच्या पत्रासंदर्भात उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आरोप दिल्यानंतर शरद पवार घरातूनच का होईन पण पुन्हा सक्रिय झाले आहेत. कालच अजित पवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख त्यांना भेटायला आले होते. त्यानंतर देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपादचा राजीनामा सोपवला होता.

    राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही घेतली पवारांची भेट

    तसेचं आता महाविकासाघाडी सरकार उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी आज सकाळपासून पुन्हा सिल्व्हर ओकवरील घडामोडींना वेग आला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार काही वेळापूर्वीच याठिकाणी आले होते. ते आता सिल्व्हर ओकवरून बाहेर पडले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत.