MPSC परीक्षा पुढे ढकला; राज ठकरेंची फोनद्वारे मुख्यमंत्र्याकडे मागणी

    मुंबई : राज्यात कोरोनाचे रुग्ण प्रचंड वेगाने वाढत आहेत. अशा परिस्थिती राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. यांचं पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  MPSC परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्याकडे केली आहे. राज ठाकरे यांनी फोन करुन ही मागणी केल्याचं कळतंय.
    दरम्यान गेल्याच महिन्यात एमपीएससीची पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. मात्र आता वाढत्या कोरोना संसर्गामुळे ही परीक्षा रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना फोन करुन वीकेंड लॉकडाऊनच्या निर्णयाला सहकार्य करण्याचं आव्हान केलं होतं. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या या चर्चेचा तपशील राज ठाकरे यांनी पत्रकारपरिषद घेऊन जाहीर केला होता.
    राज ठाकरे काय म्हणाले होते ?
    बाहेरच्या राज्यातून येणारी माणसं आणि त्यांची न झालेली चाचणी यामुळे कोरोना वाढला. तसेच इतर राज्यात कोरोना रुग्णांची चाचणीच केली जात नाहीत. त्यामुळे त्या राज्यात किती रुग्ण आहेत याचे आकडेच येत नाहीत. महाराष्ट्रात कोरोनाची टेस्टिंग केली जात आहे. त्यामुळे कोरोनाचे आकडे बाहेर येतात, असं राज म्हणाले. तसेच राज्यात परत येणाऱ्या बाहेरच्या लोकांची मोजणी करावी आणि त्यांची चाचणी करावी अशी सूचना मी केली होती. पण त्याकडे लक्ष दिलं नाही. कुणाचीही मोजणी आणि चाचणी केली नाही. त्यामुळे ही संख्या वाढली आहे, असंही राज ठाकरे म्हणाले होते.