बत्ती गुल मीटर चालू…वीज चोरांवर कारवाई करण्याचा महावितरणने दिला इशारा

वीजचोरांवर कायदेशीर कारवाई (action against power thieves) करून पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा महावितरणने दिला आहे.

मुंबई : महावितरणने (MSEDCL) वीज चोरांविरूद्ध कारवाई करण्याचा इशारा (Warn) दिला आहे. ग्राहकांनी अधिकृत वीज जोडणी घेऊन विजेचा वापर करावा, अन्यथा वीजचोरांवर कायदेशीर कारवाई (Action against power thieves) करून पोलिसांत (Police)  गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा महावितरणने दिला आहे. अनेक ठिकाणी मीटरशी छेडछाड करणे किंवा मीटर बायपास करणे तसेच वीजतारांवर आकडे टाकून वीजचोरी करणे, असे अनेक प्रकार आढळून आले आहेत. त्यामुळे भांडुप परिमंडलातील मोहीम (Campaign)  सुरू करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

कर्मचाऱ्याने गैरकृत्य केल्यामुळे त्याला कंपनीच्या सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. गैर कृत्य केल्यामुळे महावितरणाचे महसुली नुकसाने होते. त्यामुळे या पुढे वीजचोरीच्या कोणत्याही वीज कर्मचाऱ्याचा सहभाग असल्यास जबाबदार कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे वीज चोरी करणाऱ्यांबाबत माहिती दिली असता, त्याच्या मोबदल्यात रोख रक्कमेच्या स्वरूपात बक्षीस देण्यात येणार आहे.

दरम्यान, महावितरणच्या बारामती विभागाने वीजचोरांवर कारवाई करण्यासाठी ‘आकडे हटवा, कनेक्शन वाढवा’ मोहीम उघडली असून अवघ्या पंधरा दिवसांत बारामती व इंदापूर तालुक्यात १५९७ वीजचोरांवर धडक कारवाई केली आहे.