नीता भाभी और मुकेश भैय्या, ये तो ट्रेलर है..,पोलिसांना सापडलेल्या पत्रातून मुकेश अंबानींना धमकी

“नीता भाभी और मुकेश भैय्या, ये तो ट्रेलर है” अशा आशयाचं पत्र पोलिसांना अंबानींच्या घराबाहेर असलेल्या स्कॉर्पिओमधून सापडल्याची माहिती आहे. पण पोलिसांनी चिठ्ठीतील मजकुराबाबत सविस्तर माहिती अद्याप दिलेली नाही. तसेच, अंबानी यांच्या ताफ्यातील आणखी काही गाड्यांच्या नंबर प्लेट पोलिसांना सापडल्या असल्याची माहिती समोर येत आहे.

    मुंबई : देशातील दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अॅन्टेलिया या निवासस्थानाबाहेर गुरूवारी संध्याकाळी स्फोटकांनी भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळल्याने एकच खळबळ उडाली. गाडीत जिलेटीन या स्फोटकांच्या सुट्टया कांड्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय गाडीत एक पत्रही सापडल्याची माहिती समोर आली आहे.

    “नीता भाभी और मुकेश भैय्या, ये तो ट्रेलर है” अशा आशयाचं पत्र पोलिसांना अंबानींच्या घराबाहेर असलेल्या स्कॉर्पिओमधून सापडल्याची माहिती आहे. पण पोलिसांनी चिठ्ठीतील मजकुराबाबत सविस्तर माहिती अद्याप दिलेली नाही. तसेच, अंबानी यांच्या ताफ्यातील आणखी काही गाड्यांच्या नंबर प्लेट पोलिसांना सापडल्या असल्याची माहिती समोर येत आहे.

    दरम्यान, या स्कॉर्पिओमध्ये मुंबई इंडियन्सचा लोगो असलेली एक बॅग, तसेच काही नंबर प्लेट्स आढळून आल्या आहेत. तसेच एक धमकीचे पत्रही या स्कॉर्पिओमधून हस्तगत करण्यात आले आहे. पोलिसांनी केलेल्या अधिक तपासामध्ये ही स्कॉर्पिओ चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच त्यावरील नंबर प्लेट खोटी असल्याचे तपासात उघड झाहे आहे. ही स्कॉर्पिओ आठ ते दहा दिवसांपूर्वी मुंबईतील विक्रोळी परिसरातून चोरी झाली होती.

    या घटनेनंतर पोलिसांनी अंबानींच्या घराबाहेर बंदोबस्तात वाढ केली असून जलद प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले आहेत. कारमायकल रोडवर मोठया प्रमाणावर पोलिसांसह कमांडोही तैनात करण्यात आले आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासत आहेत.