मुलुंडमध्ये चारचाकीने टेम्पोला दिलेल्या धडकेत टेम्पो चालकाचा मृत्यू

मुलुंड: मुलुंड गोरेगाव लिंक रोडवर नाहूरजवळ रविवारी तीन चाकी टेम्पोला पाठून चारचाकीने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये टेम्पोचालक रिझवान खान याचा मृत्यू झाला आहे. यामध्ये

 मुलुंड: मुलुंड गोरेगाव लिंक रोडवर नाहूरजवळ  रविवारी तीन चाकी टेम्पोला पाठून चारचाकीने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, यामध्ये टेम्पोचालक रिझवान खान याचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आरोपी कारचालक सुद्धा जखमी झाला असून त्याला उपचरासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.

काल रविवार असल्यामुळे सकाळी वाहनांची रहदळ कमी होती. याचा फायदा घेत भरधाव वेगाने कारचालक यश ठक्कर  मुलुंडच्या दिशेने जात होता. यावेळी भांडुप सोनापूरकडे जाणाऱ्या तीन चाकी टेम्पोला चारचाकीची जोरदार धडक बसली. ही धडक इतकी जोरात होती की कार १५० फूट समोर जाऊन अक्षरशः पलटी झाली. टेम्पो नाहूरहुन पुठ्ठे घेऊन मुलुंडच्या दिशेला जात होता. त्याचवेळी कार घेऊन एक युवक मुलुंडच्याच दिशेने जात होता. त्याने टेम्पोला धडक दिली. यात टेम्पो चालक गंभीर जखमी झाला होता. त्याला मुलुंडच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान टेम्पो चालक रिझवान शेखचा मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी ८.४५ वाजता घडली होती. या घटनेची माहिती मिळताच नवघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी यश ठक्करवर कलम २७९, ३०४ अ, ३३७, ३३८ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.