मुलुंड, वांद्रे, गोरेगाव, चेंबूर, भांडूप आणि ग्रँट रोड बनलेत कोरोनाचे हॉटस्पॉट; कंटेंटमेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्यास सुरूवात

मुंबईत बोरिवली, मुलुुंड, चेंबूर, अंधेरी पूर्व-जोगेश्वरी पूर्व हे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. मुंबईमध्ये मुलुंड, वांद्रे, गोरेगाव, चेंबूर, भांडूप आणि ग्रांट रोड या विभागात सर्वाधिक इमारती आणि त्यामधील मजले सील करण्यात आल्या आहेत.

  मुंबई : १ फेब्रुवारीपासून सर्वसामान्य प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मूभा देताच मुंबईत कोरोनाचा आकडा दुप्पटीने वाढला असून जवळपास अर्ध मुंबई कंटेटमेंट झोनच्या दिशेने पाऊल टाकत असल्याचे चित्र आहे. रेल्वे प्रवासाची मुभा आणि सर्वत्र होणारी गर्दी यामुळे मुंबईमधील कोरोना रुग्णांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

  मुंबईत बोरिवली, मुलुुंड, चेंबूर, अंधेरी पूर्व-जोगेश्वरी पूर्व हे विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहेत. मुंबईमध्ये मुलुंड, वांद्रे, गोरेगाव, चेंबूर, भांडूप आणि ग्रांट रोड या विभागात सर्वाधिक इमारती आणि त्यामधील मजले सील करण्यात आल्या आहेत.

  मुंबईत १ फेब्रुवारीपासून कोरोना रुग्ण संख्या वाढू लागल्याने पालिकेने कंटेंटमेंट झोनची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून येणाऱ्या १३०५ इमारती आणि मजले सील करण्यात आले आहेत. त्यात ७१ हजार ८३८ घरे आहेत. त्यात २ लाख ७५ हजार १५१ नागरिक राहतात. त्यात २७४९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी बहुसंख्य रुग्ण लक्षणे नसलेले असल्याने त्यांना घरीच क्वारंटाईन करण्यात आले आहे.

  मुलुंडच्या टी विभागात सर्वाधिक ५१४ रुग्ण असून या विभागातील २३३ इमारती आणि मजले सील करण्यात आले आहेत. वांद्रे पश्चिम एच वेस्ट विभागात २४४ रुग्ण असून या विभागातील ९७ इमारती आणि मजले सील करण्यात आले आहेत. गोरेगाव पी साऊथ येथे २३७ रुग्ण असून या विभागातील १२५ इमारती आणि मजले सील करण्यात आले आहेत.

  चेंबूर एम वेस्ट विभागात २३० रुग्ण असून या विभागातील १०५ इमारती आणि मजले सील करण्यात आले आहेत. भांडुप पवई विक्रोळीच्या एस विभागात २२७ रुग्ण असून या विभागातील ३३ इमारती आणि मजले सील करण्यात आले आहेत. ग्रांट रोड डी विभागात १९० रुग्ण असून या विभागातील ११० इमारती सील करण्यात आल्या आहेत.

  सर्वाधिक सील इमारती या मुलुंडच्या टी विभागात आहेत. मुलुंडमध्ये २३३, पी साऊथ १२५, घाटकोपर एन विभागात १२५, ग्रांट रोड डी विभागात ११०, बोरिवली आर सेंट्रल १०६, चेंबूर एम वेस्ट विभागात १०५ तर वरळीच्या जी साऊथ, सायन माटुंगाच्या एफ नॉर्थ विभागात एकही इमारत सील करण्यात आलेली नाही. कुर्ला एल वॉर्ड विभागाच्या हद्दीत एकच इमारत सील करण्यात आली आहे. सी विभागात ५ तर जी नॉर्थ या विभागात ७ तर पी नॉर्थ विभागात ७ इमारती सील करण्यात आल्या आहेत.