BMC

मुंबई (Mumbai)महानगरपालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/ या संकेतस्थळावर मालमत्ता कराची देयके उपलब्ध आहेत. देयकांचे अधिदान या संकेतस्थळावर तसेच महापालिकेच्या मोबाईल ॲपद्वारेही(Mobile App) करता येणे शक्य आहे.

    मुंबई: मालमत्ता कराची(Property Tax In Mumbai) जास्तीत जास्त थकबाकी वसूल करण्यासाठी मुंबई महापालिकेने(BMC) नेट बँकिंगसह (Net Banking)आता डेबिटकार्ड, क्रेडिटकार्ड, युपीआय, पेमेंट वॉलेट हे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या https://ptaxportal.mcgm.gov.in/CitizenPortal/ या संकेतस्थळावर मालमत्ता कराची देयके उपलब्ध आहेत. देयकांचे अधिदान या संकेतस्थळावर तसेच महापालिकेच्या मोबाईल ॲपद्वारेही करता येणे शक्य आहे. महानगरपालिकेच्या ऑनलाईन अधिदान सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

    कर भरण्यासाठी महापालिका संकेतस्थळावर पेमेंट गेटवे पद्धतीने माध्यमातून विनाशुल्क देयके भरता येतील. त्यात नेट बँकींग, यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेमेंट वॉलेट या पर्यायांचा देखील अवलंब करता येणार आहे. सिटी बँकच्या पेमेंट गेटवे माध्यमातून प्रति वापर २० रुपये इतके शुल्क आकारुन देयके भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. यामध्ये नेट बँकींग हा एकच पर्याय उपलब्ध आहे. अँड्रॉइड / आयओएस आधारित माय बीएमसी 24 x 7 हे मोबाईल ॲप डाऊनलोड करुन त्याद्वारे नागरिकांना मालमत्ता कराचे अधिदान करता येते. त्यात नेट बँकिंगसह यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेमेंट वॉलेट या पर्यायांचा देखील विनाशुल्क अवलंब करता येईल. महानगरपालिकेच्या सर्व विभागीय नागरी सुविधा केंद्रांवर देखील मालमत्ता कराचे अधिदान करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.