लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदींच्या छायाचित्राला मुंबई काँग्रेसचा विरोध

मुंबईच्या एकूण ९४ पोलीस ठाण्यात हा उपक्रम राबवण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. पोलीस हे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत. चारशे पोलीस कोविड काळात शहीद झाले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांचेही तातडीने लसीकरण केले पाहिजे अशी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

    लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या छायाचित्राला मुंबई काँग्रस अध्यक्ष भाई जगताप यांनी आक्षेप घेतला आहे. केरळ आणि छत्तीसगडमध्ये प्रमाणपत्रावर मोदींचे छयाचित्र नाही. त्यामुळे महाराष्ट्रातही त्यांचा फोटो नसावा. आमचा याला आक्षेप आहे, असे भाई जगताप म्हणाले.

    पोलिस कुटुंबीयांचेही तातडीने लसीकरण

    ते माध्यमांशी बोलताना म्हणाले की, काँग्रेसविरोधात देशात खोट्या टूलकिटचा प्रचार केला गेला. पण आम्ही मुंबई पोलिसांना खरे टूल किट वाटप केले आहे. मुंबईच्या एकूण ९४ पोलीस ठाण्यात हा उपक्रम राबवण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. पोलीस हे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत. चारशे पोलीस कोविड काळात शहीद झाले आहेत. त्यामुळे पोलिसांच्या कुटुंबीयांचेही तातडीने लसीकरण केले पाहिजे अशी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

    भाजप मयताच्या टाळूवरचे लोणी खाणारे

    यावेळी त्यांनी भाजपवरही टीका केली. भाजपशासित राज्यात काय परिस्थिती आहे. ते आधी चंद्रकांतदादांनी पाहावे. उत्तर प्रदेशात तर मृतदेहांची विटंबना होत आहे. मध्यप्रदेशात त्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. आम्ही वस्तुस्थिती सांगतो. भाजपचे लोक मयताच्या टाळूवरचे लोणी खाणारे आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.