मुंबईत आज कोरोनामुळे १९ जणांचा मृत्यू – दिवसभरात ८७५ नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या १३ हजार ५६४

मुंबई: मुंबईत रविवारी ८७५ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १३ हजार ५६४ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५०८ वर पोहचला आहे. तसेच २१२

 मुंबई:  मुंबईत रविवारी ८७५ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १३ हजार ५६४ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५०८ वर पोहचला आहे. तसेच २१२ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ३००४ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली. 

मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून शुक्रवारी ८७५ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १३५६४ वर पोहचली आहे. ७ ते ८ मेदरम्यान प्रयोगशाळांमध्ये केलेल्या १९७ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल रविवारी आल्याने त्याचाही यात समावेश केला आहे. मुंबईमध्ये १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ५०८ वर पोचली आहे. मृत्यू झालेल्या १९ जणांमध्ये १३ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये १० पुरुष तर ९ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ५ जण हे ६० वर्षांवरील, तर १३ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. एक जण ४० वर्षांखालील होता.