मुंबईमध्ये कोरोनाच्या २० रुग्णांचा मृत्यू तर ७९१ नवे रुग्ण- बाधितांची संख्या १४३५५ वर

मुंबई : मुंबईत शुक्रवारी ७९१ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १४ हजार ३५५ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५२८ वर पोहचला आहे. मुंबईतील

मुंबई : मुंबईत शुक्रवारी ७९१ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १४ हजार ३५५ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५२८ वर पोहचला आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून सोमवारी ७९१ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १४ हजार ३५५ वर पोहचली आहे. ८ ते ९ मेदरम्यान प्रयोगशाळांमध्ये केलेल्या १६३ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल सोमवारी आल्याने त्याचाही यात समावेश केला आहे. मुंबईमध्ये २० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ५२८ वर पोचली आहे. मृत्यू झालेल्या २० जणांमध्ये १४ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ११ पुरुष तर ९ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील १० जण हे ६० वर्षांवरील, तर ८ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. दोघांचे वय ४० वर्षांखालील होते. मुंबईत कोरोनाचे ५६७ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या १५ हजार ५९३ वर पोहचली आहे. तसेच १०६ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ३११० जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून परिपत्रकाद्वारे देण्यात आली.