मुंबईत कोरोनाचे ८०० नवे रुग्ण – कोरोनाबाधितांचा आकडा १५ हजार पार

मुंबई: मुंबईत बुधवारी ८०० नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार ५८१ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५९६ वर पोहचला आहे. मुंबईतील

मुंबई: मुंबईत बुधवारी ८०० नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार ५८१ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ५९६ वर पोहचला आहे.  मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत मंगळवारी लक्षणीय घट झाली असताना बुधवारी पुन्हा रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मुंबईतील बुधवारी ८०० कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या १५ हजार ५८१ वर पोहचली आहे. १० ते ११ मेदरम्यान प्रयोगशाळांमध्ये केलेल्या १९८ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल बुधवारी आल्याने त्याचाही यात समावेश केला आहे. 

मुंबईमध्ये ४० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ५९६ वर पोचली आहे. मृत्यू झालेल्या ४० जणांमधील १७ मृत्यू हे ४ ते १० मे दरम्यान झाले आहेत. तसेच २२ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये २४ पुरुष तर १६ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील तिघांचे वय ४० वर्षांखालील, २० जण हे ६० वर्षांवरील, तर १७ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. मुंबईत कोरोनाचे ५२८ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या १६ हजार ७३४ वर पोहचली आहे. 
तसेच ४७८ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल ३७९१ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून
देण्यात आली.