मुंबईत कोरोनाचे १२७४ नवे रुग्ण, ५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई : मुंबईमध्ये आज १२७४ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ४७ हजार १२८ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे ५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १५७५ वर पोहचला आहे.

 मुंबई : मुंबईमध्ये आज १२७४ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ४७ हजार १२८ वर पोहोचली आहे. त्याचप्रमाणे ५७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १५७५ वर पोहचला आहे.  मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातात्याने वाढ होत असून, शनिवारी कोरोना रुग्णांनी ४७ हजारांचा आकडा ओलांडला. मुंबईमध्ये शनिवारी ५७ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ३९ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ३४ पुरुष तर २३ महिलांचा समावेश आहे.

 मृतांमधील सात जणाचे वय ४० वर्षांखाली आहे. २१ जण हे ६० वर्षांवरील, तर २९जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. मुंबईत कोरोनाचे ७८८  संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ३५  हजार ६११ वर पोहचली आहे. तसेच ११८१ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल १९ हजार ९७८ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.