मुंबईत आज २६ कोरोनाबाधितांचा मृत्यू तर ६३५ नवे रुग्ण – आकडा पोहोचला ९७५८ वर

मुंबई : मुंबईत मंगळवारी ६३५ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ९७५८ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ३८७ वर पोहचला आहे. मुंबईतील

 मुंबई : मुंबईत मंगळवारी ६३५ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ९७५८ वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा ३८७ वर पोहचला आहे.  मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मंगळवारी पुन्हा दुपटीने वाढली. आतापर्यंत ३०० ते ४०० च्या दरम्यान रुग्ण सापडत असताना मंगळवारी ६३५ कोरोनाचे नवे रुग्ण सापडले. त्यामुळे मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या ९७५८ वर पोहचली आहे.

१ ते ३ मेदरम्यान प्रयोगशाळांमध्ये केलेल्या १२० जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल मंगळवारी आल्याने त्याचाही यात समावेश केला आहे. मुंबईमध्ये २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ३८७ वर पोचली आहे. मृत्यू झालेल्या २६ जणांमध्ये २२ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये १६ पुरुष तर १० महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ११ जण हे ६० वर्षांवरील, तर दोघांचे वय ४० वर्षांखालील होते. मुंबईत कोरोनाचे ४०६ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या १२ हजार ३०६ वर पोहचली आहे. तसेच २२० रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल २१२८ जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती पालिकेच्या साथरोग कक्षाकडून देण्यात आली.