मुंबईत कोरोनाचे १३८३ नवे रुग्ण – ६९ कोरोनाबाधितांचा मृत्यू

मुंबई : मुंबईमध्ये आज १३८३ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ५६ हजार ७४० वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २१११ वर पोहचला आहे.

 मुंबई : मुंबईमध्ये आज १३८३ नवे रुग्ण सापडल्याने कोरोनाबाधितांची संख्या ५६ हजार ७४० वर पोहचली आहे. त्याचप्रमाणे ६९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा २१११ वर पोहचला आहे.  मुंबईमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हजारपेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. शनिवारी मुंबईमध्ये ६९ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये ४७ जणांना दीर्घकाळ आजार होते. यामध्ये ४७ पुरुष तर २२ महिलांचा समावेश आहे. मृतांमधील ७ जणांचे वय ४० वर्षांखाली आहे. ३७ जण हे ६० वर्षांवरील, तर २५ जण हे ४० ते ६० वर्षादरम्यान होते. मुंबईत कोरोनाचे ७८८ संशयित रुग्ण सापडल्याने मुंबईतील संशयित कोरोना रुग्णांची संख्या ४० हजार ७७६ वर पोहचली आहे. तसेच ७९५ रुग्णांना घरी सोडण्यात आल्याने आतापर्यंत मुंबईतून तब्बल २५ हजार ९४७ जणांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती पालिकेच्या साथरोग नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.