WORK FROM HOME

मुंबई पालिका प्रशासनाने(BMC) सावधानतेची भूमिका घेत पालिकेच्या शाळांमधील शिक्षकांच्या(teachers) ५० टक्के उपस्थितीबाबतचा निर्णय रद्द केला आहे. तसेच शिक्षकांना ‘वर्क फ्रॉम होम’चे(work from home to teachers) आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, १७ मार्चपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

    मुंबई : मुंबईत (mumbai)गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या(corona patients in mumbai) संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मुंबई पालिका प्रशासनाने सावधानतेची भूमिका घेत पालिकेच्या शाळांमधील शिक्षकांच्या ५० टक्के उपस्थितीबाबतचा निर्णय रद्द केला आहे. तसेच शिक्षकांना ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, १७ मार्चपासून याबाबत अंमलबजावणी करण्यात येणार आहे.पालिका शिक्षण विभागाने यासंदर्भांतील एक परिपत्रक जारी केले आहे.

    मुंबईत फेब्रुवारीमध्यापर्यंत कोरोना नियंत्रणात होता ; मात्र फेब्रुवारी अखेरपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली. त्यानंतर १५ मार्चपर्यंत कोरोना रुग्णांच्या संख्येत आणखीन वाढ झाली. याची गंभीर दखल पालिकेने घेतली.

    यापूर्वी, पालिका शाळांतील शिक्षकांची ५० टक्के उपस्थिती बंधनकारक होती. मात्र आता याबाबतचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. आता पालिकेने शिक्षकांना ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश दिले आहेत.

    पालिका शिक्षकांनी घरातूनच विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे. घरी राहून काम करणाऱ्या शिक्षकांनी कामाची नोंदणी गुगल शिटवर करावी. शालेय पोषण आहाराअंतर्गत धान्याचे वितरण करण्यासाठी गरजेनुसार शिक्षकांनी उपस्थित राहण्याचे आदेश मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापनाने घ्यावे. पुढील आदेश येईपर्यंत याची अंमलबजावणी करण्यात यावी, असे पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी म्हटले आहे.