कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई पालिकेने कंबर कसली, दररोज २ लाख डोस देण्याची तयारी

सध्या मुंबईत पालिका, सरकार आणि खासगी मिळून ४३८ केंद्रांवर लसीकरण(Vaccination Centers In Mumbai) सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत ६३ लाख ४० हजार जणांना पहिला, तर २१ लाख ६० हजार जणांनी घेतला दुसरा डोस घेतला आहे. यात एकूण ८५ लाख डोस देण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी(Suresh Kakani) यांनी दिली.

    मुंबई: कोरोनाला(Corona) रोखण्यासाठी दररोज दोन लाख डोस(2 Lakh) देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या मुंबईत पालिका, सरकार आणि खासगी मिळून ४३८ केंद्रांवर लसीकरण(Vaccination Centers In Mumbai) सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत ६३ लाख ४० हजार जणांना पहिला, तर २१ लाख ६० हजार जणांनी घेतला दुसरा डोस घेतला आहे. यात एकूण ८५ लाख डोस देण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी(Suresh Kakani) यांनी दिली.

    मुंबईत गेल्या १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. यानंतर सुरुवातीला कोविन पोर्टलवर आलेल्या अडचणी आणि त्यानंतर वारंवार पुरेसे डोस मिळाले नसल्याने अनेक वेळा लसीकरणाला ब्रेक लागत आहे. त्यामुळे संपूर्ण यंत्रणा असूनदेखील डोस देता येत नाहीत. पालिकेने एकाच दिवसात दीड लाखावर डोस देऊन आपली क्षमता ही सिद्ध केली आहे. त्यामुळे मिळणाऱ्या डोसचे प्रमाण वाढल्यास पालिका दिवसाला दोन लाख डोस देऊ शकते असेही ते म्हणाले. मिळणाऱ्या डोसनुसार पालिका ५० हजार ते एक लाखापर्यंत लसीकरण करीत आहे. दरम्यान, लहान मुलांसाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या टास्क फोर्सच्या सूचनेनुसार १२ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यासाठी उपलब्ध केंद्रांवर व्यवस्था करण्यात येणार आहे. या वयोगटातील सुमारे २० लाख मुले आहेत. या मुलांचे लसीकरण सरकारच्या प्रोटोकॉलनुसार करण्यात येणार असल्याची माहितीही काकाणी यांनी दिली.

    ज्येष्ठांचे लसीकरण
    अंथरुणावर खिळलेल्या ज्येष्ठांचे घरोघरी जाऊन लसीकरण करण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. यासाठी नोंदणी केलेल्या ४५२५ जणांपैकी आतापर्यंत २५२५ जणांना पहिला डोस देण्यात आला आहे.