Journalist Welfare Fund

स्कॉटलंडच्या धर्तीवर मुंबईतील गलिच्छ वस्तीतील महिलांसाठी पालिका प्रशासनाने ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ मोफत(sanitari napkins) उपलब्ध करावेत, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी महापौर किशोरी पेडणेकर(kishori pednekar) यांच्याकडे केली आहे.

मुंबई : स्कॉटलंडच्या धर्तीवर मुंबईतील गलिच्छ वस्तीतील महिलांसाठी पालिका प्रशासनाने ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ मोफत(sanitari napkins) उपलब्ध करावेत, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी महापौर किशोरी पेडणेकर(kishori pednekar) यांच्याकडे केली आहे.

महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने मासिक पाळी ही बाब महत्त्वाची आहे. मात्र समाजात हा विषय दुर्लक्षित केला जात आहे. मुंबईत धारावी, वांद्रे, गरीबनगर, मानखुर्द, शिवाजी नगर, गणपत पाटील नगर, वडाळा गोवंडी आदी ठिकाणच्या झोपडपट्टी, गलिच्छ वस्तीत राहणाऱ्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अगदी बेताची असते. त्यामुळे त्यांना मासिक पाळीच्या दरम्यान सुरक्षिततेच्या दृष्टीने ‘सॅनिटरी नॅपकिन्स’चा वापर करणे परवडत नाही. परीणामी या महिला मासिक पाळीच्या दरम्यान जुन्याच पद्धतीचा वापर करीत असतात. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात जंतुसंसर्ग होण्याची दाट शक्यता असते. अशा प्रसंगी मुंबई महापालिकेने या महिलांच्या मदतीसाठी आर्थिक मदतीचा हात पुढे करणे गरजेचे आहे असल्याचे नगरसेविका म्हात्रे यांनी म्हटले आहे.

ही वस्तुस्थिती लक्षात घेता, स्कॉटलंडच्या धर्तीवर मुंबईतील गलिच्छ वस्तीतील महिलांसाठी पालिका प्रशासनाने ‘सॅनिटरी नॅपकिन्स’ मोफत उपलब्ध करावेत,अशी मागणी त्यांनी केली आहे. याबाबतचा ठराव पालिका सभागृहात एकमताने मंजूर झाल्यास व त्यास पालिका आयुक्तांनी मंजुरी दिल्यास त्याबाबत तात्काळ अंमलबजावणी करणे शक्य होणार आहे. तसेच, झोपडपट्टी, गलिच्छ वस्तीतील लाखो महिलांना त्याचा लाभ घेता येणार आहे. जंतुसंसर्ग टाळता येणार आहे, असे नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी म्हटले आहे.