मुंबईची असंघटित कामगार कार्यकारिणी नाही; कोण नाव सांगून काम करत असेल तर कारवाई करण्यात येईल : नवाब मलिक

मुंबईमध्ये असंघटित कामगार सेलची मुंबई कार्यकारिणी स्थापन झाली आहे असे सांगून काम करत आहेत ही बाब लक्षात आल्यानंतर मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी हे पाऊल उचलले आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या असंघटित कामगार सेलची मुंबई कार्यकारिणी स्थापन झालेली नाही मात्र काहीजण असंघटित कामगार सेलच्या नावाखाली काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. असे कोण काम करत असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली.

मुंबईमध्ये असंघटित कामगार सेलची मुंबई कार्यकारिणी स्थापन झाली आहे असे सांगून काम करत आहेत ही बाब लक्षात आल्यानंतर मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी हे पाऊल उचलले आहे.