Mumbai: Don't choke Powai Lake; BJP MP Manoj Kotak's demand to the Municipal Commissioner

पवई तलावाच्या सभोवताली पाणलोट क्षेत्रात भराव घालून सायकल ट्रॅक करण्याचे काम मुंबई महापालिकेमार्फत हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे पवई तलावाच्या(Mumbai Powai Lake) नैसर्गिक सौंदर्यास बाधा येणार आहे. त्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होईल असे मत विविध स्वयंसेवी संघटनांनी व्यक्त केले आहे.पवई तलावासारख्या हेरिटेज दर्जाच्या पाणथळ क्षेत्राचे जतन आणि संरक्षण करणे तसेच पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. सायकल ट्रॅकच्या कामामुळे त्यात कोणताही अडथळा येणार नाही.याची खबरदारी घ्या. तसेच या तलावाचा गळा घोटू नका, अशी मागणी भाजपाचे खासदार मनोज कोटक(BJP MP Manoj Kotak') यांनी पालिका आयुकत इकबाल सिंग चहल यांच्याकडे केली आहे.

    मुंवई : पवई तलावाच्या सभोवताली पाणलोट क्षेत्रात भराव घालून सायकल ट्रॅक करण्याचे काम मुंबई महापालिकेमार्फत हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे पवई तलावाच्या(Mumbai Powai Lake) नैसर्गिक सौंदर्यास बाधा येणार आहे. त्यामुळे जैवविविधतेला धोका निर्माण होईल असे मत विविध स्वयंसेवी संघटनांनी व्यक्त केले आहे.पवई तलावासारख्या हेरिटेज दर्जाच्या पाणथळ क्षेत्राचे जतन आणि संरक्षण करणे तसेच पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे आहे. सायकल ट्रॅकच्या कामामुळे त्यात कोणताही अडथळा येणार नाही.याची खबरदारी घ्या. तसेच या तलावाचा गळा घोटू नका, अशी मागणी भाजपाचे खासदार मनोज कोटक(BJP MP Manoj Kotak’) यांनी पालिका आयुकत इकबाल सिंग चहल यांच्याकडे केली आहे.

    पवई तलावाला हेरीटेज दर्जा असून येथे मोठया प्रमाणात नागरिक फिरण्यासाठी येतात. ही बाब लक्षात घेता या तलावाचे जतन आणि संवर्धन करणे कर्तव्य ठरते.कोटक यांनी आयुकतांची भेट घेउन अनेक मुददयावर त्यांच्याशी चर्चा केली.मुंबई महापालिकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता सायकल ट्रॅकच्या कामावर काही शेकडो कोटी रूपये खर्च करणे संयुक्तीक ठरणार नाही.जे सायकल ट्रॅक तलावाच्या भागात बनवण्यात येत आहेत ते काम त्वरित थांबवून पाईप लाईनच्या बाजूने जसे आधी बनवण्यात येणार होते तसे बनवावे.

    सांडपाण्याचे मार्ग बंद करा

    तलावात सोडण्यात येणारे सर्व सांडपाण्याचे मार्ग बंद करण्यात यावेत. तलावामध्ये उगवलेल्या वनस्पतीमुळे पाणलोट क्षेत्रात अडथळा निर्माण होतो, तरी या वनस्पती त्वरित साफ करण्यात याव्यात.वृक्षतोड झालेल्या झाडांच्या जागी नवीन वृक्षारोपण करण्यात यावे. बिबटयांच्या वावरासाठी आणि मगरीच्या संवर्धनासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात आणि या तलावाचा गळा घोटू नये अशी अपेक्षा पालिका आयुकतांकडे खासदार कोटक यांनी केली आहे.