mumbai fire broke out near chembur railway station janta xerox market
चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी

आगीमुळे परिसरात धुराचे लोट मोठ्या प्रमाणात उठल्याचं पाहायला मिळालं. रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या मोठ्या बाजारपेठेतील काही दुकानांमध्ये ही आग भडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळताच तातडीनं अग्निशमन दलाच्या गाड्या आणि वॉटर टँक घटनास्थळी पोहोचले आहेत.

मुंबई : कोरोना (corona) अनलॉक ०५ (unlock 5) चा टप्पा सुरू होत असतानाच मुंबईच्या (Mumbai) चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ (Chembur Railway Station) मोठी दुर्घटना घडली आहे. चेंबूर रेल्वे स्थानक परिसरातील बाजारपेठेत (Janta Market) मोठी आग (fire) लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या (Mumbai Fire Brigade) १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीमुळे परिसरात धुराचे लोट मोठ्या प्रमाणात उठल्याचं पाहायला मिळालं. रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या मोठ्या बाजारपेठेतील काही दुकानांमध्ये ही आग भडकल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आगीची माहिती मिळताच तातडीनं अग्निशमन दलाच्या गाड्या आणि वॉटर टँक घटनास्थळी पोहोचले आहेत.

दरम्यान सध्या या परिसरात आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू असून इथे कोणी अडकले असल्याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा आणि धूर दिसत असल्यानं नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

गुरुवारी सकाळी ५ वाजण्याच्या सुमारास चेंबूर रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या जनता बाजारपेठेतील एका झेरॉक्सच्या दुकानाला आग लागली. झेरॉक्सच्या दुकानाला लागलेल्या आगीनं रौद्र रुप धारण करत आजूबाजूची तीन दुकानंही आपल्या भक्ष्यस्थानी केली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवलं असून सध्या कुलिंग ऑपरेशनचं काम सुरू आहे.

आधी झेरॉक्सच्या दुकानाला लागलेली आग पसरत बाजूच्या ४ दुकानापर्यंत पोहचली अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळेपर्यंत ४ ते ५ दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून ती जाळून खाक झाली. जनता मार्केटमध्ये जवळपास १०० च्या आसपास झेरॉक्स, स्टेशनरीची दुकान आहेत. या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी असते पण पहाटेची वेळ असल्यानं दुकानं बंद होती आणि त्यामुळे मोठी  जीवितहानी टळली आहे. मात्र आगीचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.