Mumbai girl drowns in Lonavla

लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ध्वनी व तिच्या दोन बहिणी अशा तिघी सख्ख्या बहिणी व त्यांची एक मैत्रीण या कारने लोणावळ्यात आल्या होत्या. दुपारी एकच्या दरम्यान त्या चौघीजणी लोणावळ्यातील तुंगार्ली धरणाकडे फिरायला गेल्या व त्या ठिकाणी बहिणीचा वाढदिवस साजरा केला. यादरम्यान ध्वनीला पाण्याच्या खोलीचा व परिस्थितीचा अंदाज न आल्याने ती पाण्यात बुडाली.

    मुंबई : मोठ्या बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी लोणावळ्यात आलेल्या लहान बहिणीचा तुंगार्ली धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी अडीचच्या दरम्यान घडली. ध्वनी मनीष ठक्कर (१८) असे तुंगार्ली धरणात बुडून मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ती मुंबईतील पवई येथील रामबाग मनुभाई चाळ येथील रहिवासी होती.

    लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बहिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ध्वनी व तिच्या दोन बहिणी अशा तिघी सख्ख्या बहिणी व त्यांची एक मैत्रीण या कारने लोणावळ्यात आल्या होत्या. दुपारी एकच्या दरम्यान त्या चौघीजणी लोणावळ्यातील तुंगार्ली धरणाकडे फिरायला गेल्या व त्या ठिकाणी बहिणीचा वाढदिवस साजरा केला. यादरम्यान ध्वनीला पाण्याच्या खोलीचा व परिस्थितीचा अंदाज न आल्याने ती पाण्यात बुडाली.

    ध्वनी बुडू लागल्याने तिच्या बहिणींनी आरडाओरडा केला. हा आरडाओरडा ऐकून त्याठिकाणी असलेल्या स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत ध्वनीला वाचवण्याचा प्रयत्न केला. दहा मिनीटांच्या प्रयत्नानंतर स्थानिकांना ध्वनीला बाहेर काढण्यात यश आले. बाहेर काढल्यानंतर तिला तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]