smashanbhumi

हिरालाल पारीख परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ४० कोटी रुपये खर्च करुन वरळी(worli) येथील स्मशानभूमी हायटेक (highteck)करण्याचे काम सुरु आहे. महापौर किशोरी पेडणेकर(kishori pednekar) यांनी मंगळवारी या ठिकाणी भेट देत कामाची पाहणी केली.

  मुंबई: कोरोनामुळे(corona) एखाद्याचा मृत्यू(death) झाला तर संबंधित व्यक्तीच्या घरच्यांना अंत्यविधीला उपस्थित राहता येत नाही. तर अन्य कारणांमुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला अन् नातेवाईक विदेशात असल्यास त्या व्यक्तीच्या अंत्यविधीला(last rituals) ठराविक वेळेत उपस्थित राहणे शक्य होत नाही. त्यामुळे जेथे आहे तिथून अंत्यविधी पाहाता येण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. वरळी येथील स्मशानभूमीत येत्या ऑक्टोबर २०२१ पर्यंत ही सुविधा प्रत्यक्षात उतरणार आहे.

  हिरालाल पारीख परिवार चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ४० कोटी रुपये खर्च करुन वरळी येथील स्मशानभूमी हायटेक करण्याचे काम सुरु आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी या ठिकाणी भेट देत कामाची पाहणी केली.
  पिण्याचे पाणी २४ तास उपलब्ध व्हावे, शांत वातावरणात काही वेळ जावा,यासाठी सुशोभित उद्यान असा आराखडा तयार करण्यात आला आहे. वरळी येथील माता रमाई आंबेडकर स्मशानभूमीत दोन एकर जमीनवर उद्यान उभारण्यात येणार असल्याचे हिरालाल पारीख परिवार चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी डॉ. आर. पारीख यांनी सांगितले.

  स्मशानभूमीत कोणत्या सुविधा असणार ?

  • ३ गॅस दाहिनी
  • २ लाकडावरची दाहिनी
  • १०० व्यक्ती बसू शकतील अशी वेटींग रुम
  • सीसीटीव्ही कॅमेरे
  • दोन एकर जमीनीवर सुशोभित उद्यान
  • कुठल्याही समाजातील मृतदेहावर अंत्यसंस्कार
  • व्हिडिओ रेकॉर्डिंगची सोय तसेच व्हिडिओची लिंक महापालिकेल्या पोर्टलवर होणार उपलब्ध

  मुंबईतील सर्वात मोठ्या स्मशानभूमीपैकी एक असलेली ही स्मशानभूमी असून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या साडेनऊ एकर  जागेमध्ये ही व्यापलेली आहे. सामाजिक संस्थेच्या वतीने तीन टप्प्यांमध्ये स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम करण्यात येत असून पहिल्या टप्प्याचे काम सद्यस्थितीत वेगाने सुरू असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. आगामी अडीच ते तीन वर्षांमध्ये हे संपूर्ण काम पूर्ण होणार आहे. अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज अशी ही स्मशानभूमी तयार करण्यात येणार असल्याचे महापौरांनी यावेळी सांगितले.