मुंबई हाय दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढला; ३७ ठार, तर ३८ कर्मचारी अद्याप बेपत्ता

नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व बचाव पथकाच्या प्रयत्नातून १८६ कर्मचाऱ्यांना वाचविण्यात आले; परंतु बुधवारी ३६ कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळले. त्यानंतर बचावकार्य सुरू असताना रात्री आणखी ११ कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले त्यामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ३७वर गेला. आयएनएस कोलकाता बुधवारी रात्री कर्मचाऱ्यांचे मृतदेह घेऊन मुंबईत पोहोचली. नौदलाचे बचावकार्य अखंडपणे सुरू आहे. बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अरबी समुद्र पिंजून काढत आहेत.

  मुंबई : मुंबई हाय तेल प्रकल्पा जवळ नौका दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढून ३७ झाला आहे. रात्रभरात आणखी ११ कर्मचाऱ्यांचे मृतदेह नौदलाला सापडले आहेत. या दुर्घटनेत नौदलाने प्रयत्नांची शर्थ करत १८६ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश मिळवले आहे.  दरम्यान या प्रकरणी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

  आणखी ११ कर्मचाऱ्यांचे मृतदेह

  नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व बचाव पथकाच्या प्रयत्नातून १८६ कर्मचाऱ्यांना वाचविण्यात आले; परंतु बुधवारी ३६ कर्मचाऱ्यांचे मृतदेह आढळले. त्यानंतर बचावकार्य सुरू असताना रात्री आणखी ११ कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले त्यामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा ३७वर गेला. आयएनएस कोलकाता बुधवारी रात्री कर्मचाऱ्यांचे मृतदेह घेऊन मुंबईत पोहोचली. नौदलाचे बचावकार्य अखंडपणे सुरू आहे. बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी अरबी समुद्र पिंजून काढत आहेत.

  अजूनही ३८ कर्मचारी बेपत्ता 

  तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ अर्थात ‘ओएनजीसी’च्या हीरा इंधन विहीर परिसरात ‘पापा ३०५’ ही बार्ज (तराफा) ‘तौक्ते’ चक्रीवादळात सोमवारी रात्री समुद्रात बुडाली. अपघातावेळी २६१ कर्मचारी तेथे कार्यरत होते. या सर्व कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी नौदलाच्या पाच युद्धनौका, तटरक्षक दलाच्या दोन नौका तसेच, दोन अन्य जहाजे सोमवार सायंकाळपासून बचावकार्य करीत आहेत. याशिवाय नौदलाची ‘सी किंग’ हेलिकॉप्टर आणि ‘पी ८ आय’ हे टेहाळणी विमानही मोहिमेत मदत करीत आहे.

  मुंबई हाय दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढत असल्याने चिंता वाढली आहे. अजूनही ३८ कर्मचारी बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. तर, एकूण २६१ कर्मचाऱ्यांपैकी १८६ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले आहे.  दरम्यान, या प्रकरणी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.