मुंबईत मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास सशर्त परवानगी, राज्यात मात्र बंदी

मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने काल महत्त्वाचा निकाल दिला. मुंबई उच्च न्यायालयाने फक्त मुंबईत मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास सशर्त परवानगी दिली आहे.

मुंबई : मोहरम ताजिया (Moharram Taziya)  मिरवणूक (procession) काढण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने (mumbai high court) काल महत्त्वाचा निकाल दिला. मुंबई उच्च न्यायालयाने फक्त मुंबईत मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास सशर्त परवानगी दिली आहे. मुंबई वगळता राज्यात (maharashtra) कुठेही मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास परवानगी नाही, असंही न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलं आहे.

कोरोनामुळे (corona virus) देशभरात बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, अनेक वार्षिक कार्यक्रमांबरोबर धार्मिक सण उत्सवांवरही सरकारकडून कोरोना प्रसाराच्या प्रादुर्भावाचा धोका लक्षात घेऊन बंधने आणण्यात आली आहेत. मुस्लिम समुदायात मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यात येते. मात्र, कोरोनामुळे सोशल डिस्टसिंगसह (social distansing) इतर बंधने आणण्यात आल्यानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने फक्त मुंबईत मोहरम ताजिया मिरवणूक काढण्यास परवानगी दिली आहे. या मिरवणुकीत पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सहभागी होता येणार नाही. त्याचबरोबर मुंबई वगळता राज्यात इतर कुठल्याही भागात मिरवणूक काढण्यास परवानगी नाही, असंही न्यायालयानं आदेशात स्पष्ट केलं आहे.

न्यायालयाने आदेशात स्पष्ट केल्या या गोष्टी

मिरवणूक काढण्याच्या मागणीसंदर्भात लखनऊ येथील मुस्लिम समुदायातील काही व्यक्तींनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती. सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील खंठपीठासमोर झालेल्या सुनावणीत मागणी फेटाळून लावत देशभरात मोहरम मिरवणुका काढण्यास नकार दिला होता. न्यायालय म्हणाले,”जर आम्ही मोहरम मिरवणूक काढण्यास परवानगी दिली तर गोंधळ होईल आणि एका विशिष्ट समुदायाला कोरोनाचा प्रसार केला म्हणून लक्ष्य केलं जाईल. आम्हाला ते नको आहे. एक न्यायालय म्हणून आम्ही जनतेच्या आरोग्याबद्दल धोका पत्करू शकत नाही. जर तुम्ही एखाद्या विशिष्ट ठिकाणी मिरवणूक काढण्याची मागणी केली, तर आम्ही उद्भभवणाऱ्या धोक्याचा विचार केला असता,” असं न्यायालयानं आदेशात म्हटलं होतं.