mumbai high court slammed enforcement department nrvb

भिवंडीतील धामणकर्णातील पटेल कंपाऊंडमधील ४३ वर्षीय जिलानी इमारत २१ सप्टेंबरला कोसळली. भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळल्यामुळे ४१ जण मृत्युमुखी पडले. या इमारतीत ४० फ्लॅट होते आणि येथे सुमारे १५० लोक राहत होते. मृतांमध्ये १८ मुले आहेत, ज्यांचे वय २ ते १५ दरम्यान आहे. २५ लोकांना जिवंत बाहेर काढण्यात आले.

मुंबई : महाराष्ट्रातील भिवंडी (Bhiwandi ) येथे तीन मजली इमारत (building accident ) कोसळल्याने ४१ जणांचा मृत्यू झाला होता. मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) या प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र सरकार आणि संबंधित महानगरपालिकांना पक्षकार बनवून जनहित याचिका  (public interest petition) दाखल करून घेलती आहे.

भिवंडीतील धामणकर्णातील पटेल कंपाऊंडमधील ४३ वर्षीय जिलानी इमारत २१ सप्टेंबरला कोसळली. भिवंडीमध्ये तीन मजली इमारत कोसळल्यामुळे ४१ जण मृत्युमुखी पडले. या इमारतीत ४० फ्लॅट होते आणि येथे सुमारे १५० लोक राहत होते. मृतांमध्ये १८ मुले आहेत, ज्यांचे वय २ ते १५ दरम्यान आहे. २५ लोकांना जिवंत बाहेर काढण्यात आले.

मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश दीपंकर दत्त यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने महाराष्ट्र राज्य, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि भिवंडी- निजामपूर, कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि नवी मुंबईच्या नागरी संस्थांचे या प्रकरणातील प्रतिवादी म्हणून नावे ठेवली आहेत. यासह मुख्य न्यायाधीश म्हणाले, “भिवंडीतील या घटनेव्यतिरिक्त मुंबईतील परिस्थितीही गंभीर असल्याचे आम्हाला सांगण्यात आले आहे.” न्यायाधीश म्हणाले, “आम्ही राज्य आणि सर्व संस्था प्रतिवादी बनवत आहोत आणि नोटीस बजावत आहोत”.