अनलॉकमध्ये मुंबई लेव्हल तीनमध्ये ; मुंबई लोकल सर्वांसाठी बंदच! मुंबई महापालिकेची नियमावली जारी

राज्य सरकारने अनलॉक बाबत जे मार्गदर्शन तत्वे ठरवून दिली आहेत. त्यात स्थानिक प्रशासन बदल करू शकते, असे शासनाने म्हटले आहे. त्याचा फायदा घेत सरकारच्या लेव्हल ३ मधील जिल्ह्यांमध्ये लोकल रेल्वे या वैद्यकीय, अत्यावश्यक आणि महिलांसाठी सुरु करावी

  मुंबई: राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार मुंबई महापालिकेचा दोन आठवड्यांचा सरासरी पॉझिटिव्हिटी रेट साडेपाच टक्क्यांवर आहे. तर, सरासरी ऑक्सिजन बेड ३२ ते ३४ टक्क्यांपर्यंत व्यापलेले आहेत. या आकडेवारीनुसार मुंबई महापालिका लेव्हल ३ मध्ये आहे. यानुसार मुंबई महापालिकेने अनलॅाकची नियमावली जारी केली आहे. मुंबईचा आताचा पॉझिटिव्हिटी रेट ५.३० टक्के असल्याने येत्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेटमध्ये सुधारणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना लोकलसाठी आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे

  राज्य सरकारने शुक्रवारी, ४ जून रोजी रात्री उशिरा अनलॉकची घोषणा केली, त्यात ५ लेव्हलमध्ये जिल्ह्यांची विभागणी केली. रुग्णांची पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड व्याप्तीनुसार ही लेव्हल ठरवण्यात आली. त्याचवेळी  राज्य सरकारने अनलॉक बाबत जे मार्गदर्शन तत्वे ठरवून दिली आहेत. त्यात स्थानिक प्रशासन बदल करू शकते, असे शासनाने म्हटले आहे. त्याचा फायदा घेत सरकारच्या लेव्हल ३ मधील जिल्ह्यांमध्ये लोकल रेल्वे या वैद्यकीय, अत्यावश्यक आणि महिलांसाठी सुरु करावी, असे म्हटले आहे. मात्र मुंबई महापालिकेने त्यातून महिला शब्द वगळल्याने लोकल रेल्वे पूर्वीप्रमाणेच अत्यावश्यक सेवांसाठीचा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

  मुंबईत काय सुरु राहणार!
  अत्यावश्यक दुकाने सर्व दिवस सकाळी ७ ते ४ आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते ४ सर्व खुले राहतील. तर शनिवारी रविवारी बंद राहतील.
  – माॅल्स थिएटर्स सर्व बंद राहतील
  – हाॅटेल्स सोमवार ते शुक्रवार ५० टक्के सायंकाळी ४ पर्यंत खुले राहतील त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल, शनिवार रविवार बंद राहतील
  – लोकल रेल्वे बंद राहतील
  मॉर्निंक वाॅक, मैदाने , सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ पर्यंत मुभा
  – खासगी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील
  शासकीय कार्यालय ५० टक्के क्षमतेने सुरु राहतील
  आऊटडोअर क्रीडा सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते रात्री ९.
  – स्टुडियोत चित्रीकरण परवानगी
  मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के सायंकाळी ४ पर्यंत, सोमवार ते शुक्रवार.
  – लग्नसोहळे ५० टक्के क्षमतेने तर अंत्यविधी २० लोकाना मुभा असेल
  – बांधकाम सायंकाळी ४ वाजेपर्यंत मुभा
  – कृषी सर्व कामाना मुभा
  – ई काॅमर्स सुरु ठेवू शकतो
  जमावबंदी सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यानंतर संचारबंदी