mumbai-local

पाच स्तरांपैकी पहिल्या स्तरात येणाऱ्या जिल्ह्यातील वा महानगरपालिकाला क्षेत्रातील निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्याची सूट दिलेली आहे. त्याचबरोबर लोकल सेवा सुरू करण्यासही परवानगी(Permission To Local) दिलेली आहे. त्यामुळे मुंबईत लोकल सेवेबद्दल काय निर्णय होणार हे एक दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.

    राज्यामध्ये वारंवार लॉकडाऊन(Lockdown) आणि अनलॉक करावा लागू नये, यासाठी ठाकरे सरकारने पंचस्तरीय सूत्र तयार(5 Stage Program For State) केलं आहे. निर्बंध(Restrictions) वाढवण्याचा वा शिथिल करण्याचा निर्णय घेण्यासाठी कोरोना परिस्थितीनुरूप पाच स्तर तयार करण्यात आले आहेत. त्यासाठी नियमावली तयार केली असून, काही निकषही ठरवण्यात आले आहेत. या निकषानुसार मुंबईकरांना(Mumbai) पुढील आठवड्यात मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

    पाच स्तरांपैकी पहिल्या स्तरात येणाऱ्या जिल्ह्यातील वा महानगरपालिकाला क्षेत्रातील निर्बंध मोठ्या प्रमाणात शिथिल करण्याची सूट दिलेली आहे. त्याचबरोबर लोकल सेवा सुरू करण्यासही परवानगी(Permission To Local) दिलेली आहे. त्यामुळे मुंबईत लोकल सेवेबद्दल काय निर्णय होणार हे एक दोन दिवसात स्पष्ट होणार आहे.

    राज्य सरकारने उपलब्ध ऑक्सिजन बेड आणि पॉझिटिव्ही रेट असे काही निकष ठेवलेले आहेत. पॉझिटिव्ही रेट जास्त असेल, अशा जिल्ह्यांतील वा शहरातील निर्बंध कायम ठेवण्याची सूचना यात करण्यात आलेली आहे. तर पॉझिटिव्ही रेट ५ टक्क्यांच्या आत असणाऱ्या जिल्ह्यात काही ठिकाणीच निर्बंध ठेवण्याची सूचना आहे. प्रत्येक आठवड्यातील पॉझिटिव्ही रेट आणि उपलब्ध बेडच्या संख्येनुसार स्थानिक प्रशासन हा निर्णय घेणार आहे.

    या आठवड्यातील सर्व जिल्ह्यांच्या पॉझिटिव्हीटी रेटची यादी राज्य सरकारने जाहीर केली असून, त्यात मुंबई आणि मुबई उपनगरांचा पॉझिटिव्हीटी रेट पाच टक्क्यांच्या आत म्हणजेच ४.४० टक्के इतका कमी झाला आहे. त्यामुळे मुंबईतील निर्बंध आणखी कमी होण्याबरोबरच सर्वसामान्यांना लोकल प्रवासास परवानगी देण्याबद्दलचा निर्णयही घेतला जाऊ शकतो.

    हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारने महापालिकेला दिलेला असल्याने मुंबई महापालिका काय निर्णय घेणार, याकडे सगळ्याचंच लक्ष असणार आहे.