यंदा गणेशोत्सवात ‘माझं घर, माझं मंडळ, माझा बाप्पा’ उपक्रम राबवा, मुंबईत गणेश दर्शनासाठी बाहेर जाणे टाळा – महापौरांनी केले आवाहन

मुंबईत(Mumbai) मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाचा सण(Festival Of Ganeshotsav) साजरा केला जाणार आहे. या सणाच्या निमित्ताने नागरिकांनी कोणाच्या घरी जाऊ नये, कोणाला आपल्या घरी बोलावू नये, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही आपल्या कार्यकर्त्यांना काम नेमून द्यावे, जेणेकरून मंडपात बाहेरची लोक न आल्यास गर्दी होणार नाही आणि कोरोनाचा प्रसार रोखता येईल. यासाठी सर्वानी आपल्या घरात आणि मंडळांनी मंडपात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी (Mayor Kishori Pednekar) केले आहे.

    मुंबई : मुंबईत(Mumbai) कोरोना रुग्णांची संख्या(Corona Patients) पुन्हा वाढू लागली आहे.यंदाच्या गणेशोत्सवात गर्दी टाळून तिसरी लाट राेखण्यासाठी ‘माझं घर, माझा बाप्पा’ तसेच ‘माझं मंडळ, माझा बाप्पा’, हा उपक्रम राबवा असे आवाहन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर(Appeal By Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी मुंबईकराना केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपणही कोणाकडे गणेश दर्शनासाठी जाणार नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले आहे.

    मुंबईतील शिक्षकांना महापौर शिक्षक पुरस्काराचे वितरण महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाचा सण साजरा केला जाणार आहे. या सणाच्या निमित्ताने नागरिकांनी कोणाच्या घरी जाऊ नये, कोणाला आपल्या घरी बोलावू नये, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही आपल्या कार्यकर्त्यांना काम नेमून द्यावे, जेणेकरून मंडपात बाहेरची लोक न आल्यास गर्दी होणार नाही आणि कोरोनाचा प्रसार रोखता येईल. यासाठी सर्वानी आपल्या घरात आणि मंडळांनी मंडपात गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

    आमच्यासारखे राजकारणी जिथे जातात त्याठिकाणी गर्दी होते. गर्दी करू नका म्हटले तरी पन्नास कार्यकर्ते जमतात आणि गर्दी होते. मुख्यमंत्र्यांनी गर्दी करू नका असे आवाहन केले आहे. त्यानुसार मी कोणत्याही गणेश उत्सव मंडळांना भेट देणार नाही तसेच कोणाच्या घरी गणपतीच्या दर्शन घ्यायला जाणार नाही, असेही महापाैरांनी स्पष्ट केले.