kishori pednekar

केंद्र सरकार खासगी क्षेत्राला पैसे घेऊन लस पुरवठा(Vaccine Supply) करत आहे. त्याप्रमाणेच राज्य आणि महापालिकेला लस पुरवठा करावा, आम्हीही पैसे देतो. इतकंच नाही, तर लोकांना ही लस मोफत देतोय, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

    कोरोनाच्या लसींचा देशात सगळीकडे तुटवडा(Corona Vaccination Shortage) जाणवत आहे.अनेक लोक यावरून केंद्र सरकारवर टीका करत आहेत. या मुद्द्यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही बोट ठेवलं आहे.

    केंद्र सरकार खासगी क्षेत्राला पैसे घेऊन लस पुरवठा(Vaccine Supply) करत आहे. त्याप्रमाणेच राज्य आणि महापालिकेला लस पुरवठा करावा, आम्हीही पैसे देतो. इतकंच नाही, तर लोकांना ही लस मोफत देतोय, असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

    महापौर पेडणेकर म्हणाल्या,मला अशी माहिती मिळाली आहे की, खासगी रुग्णालये केंद्राकडून विकत घेऊन लसीकरण करत आहेत. त्यांच्याकडून लस घेण्यासाठी नागरिकांना पैसे द्यावे लागत आहेत. महापालिकेकडे तसं नाही. महापालिका लोकांना मोफत लस देत आहे आणि मोफतच देणार.

    आम्ही केंद्राला लशींसाठी पैसे द्यायला तयार आहोत, पण तो पुरवठा महापालिकेला मिळत नाही. केंद्राकडून ज्याप्रमाणे खासगी क्षेत्राला लस पुरवली जात आहे, त्याचप्रमाणे त्याच किमतीत आम्हाला लस द्यावी. राज्य सरकार, महानगरपालिका पैसे देऊन लस खरेदीसाठी तयार आहे,” असं महापौर पेडणेकर म्हणाल्या.

    केंद्राने आम्हाला लस पुरवावी, आम्ही लोकांना मोफत देतो. पण, केंद्र सरकार महापालिकेला न देता खासगी क्षेत्राला देत आहेत. त्यामुळे कुणी एक हजार रुपयाला, कुणी १२००, तर कुणी १८०० रुपयांना लस विकत आहेत. गरीब-श्रीमंत भेदभाव न करता सगळ्या मुंबईकरांना आम्ही लस देतोय. लशींसाठी केंद्राला पैसे द्यायला तयार आहोत, मुख्यमंत्र्यांनीही १२ कोटी एकरकमी देण्याची तयारी दाखवली आहे. पण काय होतंय हेच कळत नाही. सगळा संभ्रम आहे. महापालिकेला ज्यावेळीही लस मिळाली, सगळी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आली. लोकांना मोफत लस दिली गेली, असे त्या म्हणाल्या.