छातीत दुखायला लागल्याने महापौर किशोरी पेडणेकर रुग्णालयात दाखल

महापौर किशोरी पेडणेकर यांनी यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज दुपारी किशोरी पेडणेकर यांच्या छातीत दुखायला लागले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्यामुळे वेगवेगळ्या चाचण्या करण्यात येत आहे. किशोरी पेडणेकर यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.

    मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. अचानक छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महापौरांच्या कार्यालयातून तशी माहिती देण्यात आली आहे.

    महापौर किशोरी पेडणेकर यांनी यांच्या कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज दुपारी किशोरी पेडणेकर यांच्या छातीत दुखायला लागले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. छातीत दुखू लागल्यामुळे वेगवेगळ्या चाचण्या करण्यात येत आहे. किशोरी पेडणेकर यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.

    किशोरी पेडणेकर यांना काल रात्रीपासूनच त्रास होत होता. छातीत दुखू लागल्याची तक्रार त्यांनी केली होती. मात्र, हा त्रास अधिक वाढल्याने आज सकाळी त्यांना ग्लोबल रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना रुग्णालयात दाखल करताच तातडीने विविध चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टरांचं एक पथक त्यांच्यावर उपचार करत आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं वैद्यकीय सूत्रांनी सांगितलं. मात्र, त्यांना नेमका काय त्रास होत आहे आणि त्यांना कधीपर्यंत डिस्चार्ज होईल याबाबतची माहिती देण्यात आलेली नाही.

    दरम्यान, मुंबईत काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी कोसळलेल्या दरडींमुळे आतापर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. याच घटनांचा किशोरी पेडणेकर यांनी आज सविस्तर आढावा देखील घेतला होता. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधून घडलेल्या घटनांची माहिती देखील दिली होती.