भाजप नेते मदत करण्याऐवजी कोरोनावरून राजकारण करत आहेत –  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची टीका

राज्यात कोरोनाग्रस्तांची(corona) संख्या वाढत आहे. मात्र यासाठी काही मदत करण्याऐवजी भाजप नेते राजकारण करत असल्याची घणाघाती टीका शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( mayor Kishori Pednekar) यांनी केली. 

    मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांची(corona) संख्या वाढत आहे. मात्र यासाठी काही मदत करण्याऐवजी भाजप नेते राजकारण करत असल्याची घणाघाती टीका शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर ( mayor Kishori Pednekar) यांनी केली.

    महापौर म्हणाल्या  की, राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत तर परिस्थिती खूपच चिंतानतक आहे.  राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, लॉकडाऊन हा कोरोनाला थोपवण्याचा एकच पर्याय नसून बाकी इतर गोष्टींनीसुद्धा कोरोना संसर्ग कमी करता येतो, अशी भूमिका भाजपने घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर टीका केली आहे.

    त्या म्हणाल्या की, निर्बंध घालूनही लोक एकत नसतील तर कडक लॉकडॉऊनच्या दिशेनं जावं लागेल, हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. पण काही लोक त्याचं राजकारण करत आहेत. काही भाजप नेतेमंडळींनी कोरोनाच्या काळात मुंबईतच उपचार घेतले आहेत. त्यांनी लसीकरणाचा फायदाही घेतला. सध्या केंद्राकडून जास्तीत जास्त मदत आणणे गरजेचे आहे. मात्र, कुठलीही मदत न करता फक्त विरोध करायचा आणि नुसतं राजकारण करायचं एवढंच भाजपचे नेते करत आहेत.

    पेडणेकरांनी सांगितले की, भाजपचे काही नेते बेताल वक्तव्य करतात. कोरोनाकाळात मुंबई महापालिकेने कोरोनाग्रस्तांसाठी बेड आणि लसीकरणासाठी प्रयत्न केला. पालिकेने बेड आणि लस जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, केंद्र सरकारकडून लसींचा पुरवठा होत नाही. दुसरीकडे भापज नेते राजकरण करत आहेत. ते हिंदूंच्या सणांबद्दल बोलत आहेत. लॉकडाउनला विरोध करणार असे म्हणत, ते बेताल वक्तव्य करत आहेत, असेही त्या म्हणाल्या.