सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु होणार का ? मुंबईत पुन्हा निर्बंध लावले जाणार का ? किशोरी पेडणेकर म्हणाल्या….

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबईतील गर्दीबाबत चिंता व्यक्त करत पुन्हा कडक निर्बंधांचा(Restrictions in Mumbai) इशारादेखील दिला आहे. दरम्यान आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे.

    कोरोनाच्या निर्बंधांमधून सूट देण्यात आल्यानंतर ब्रेक द चेन गाईडलाईनमध्ये बदल करण्यात आल्यानंतर मुंबईच्या रस्त्यांवर होणारी (Crowd inMumbai) गर्दी राज्य सरकारसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबईतील गर्दीबाबत चिंता व्यक्त करत पुन्हा कडक निर्बंधांचा(Restrictions in Mumbai) इशारादेखील दिला आहे. दरम्यान आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे.

    किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मुख्यमंत्र्यांनी कालच इशारा दिलेला आहे. त्याचं लोकांनी पालन केलं पाहिजे. कारण कोणताही निर्णय, कोणतंही संकट एकटं राज्य, महापालिका किंवा केंद्रावर सोडून चालत नाही, त्यासाठी लोकांचा साथ हवी आणि त्यांनी ती दिलीच पाहिजे. जर लोक साथ देत नसतील तर वेगळा विचार करावा लागेल असं मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलं आहे.


    त्या पुढे म्हणाल्या की, राज्य सरकार हे सगळं पाहत आहे. राजेश टोपे, मुख्यमंत्री सगळं अनुभवत असून निश्चित याच्यावर तोडगा काढला जाईल.

    किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मागच्या वेळेस आपण पाहिलं की बरीचशी लोकं रेल्वेमधून विना मास्क प्रवास करतात. लस घेतली तरी मास्क लावणं बंधनकारक आहे. ते लावताना कोणी दिसलं नाही. तसेच ट्रेनमध्ये गर्दीसुद्धा दिसत होती. त्यामुळे आता सर्वसामान्यांसाठी रेल्वे प्रवासाबाबत राज्य सरकार निर्णय घेईल.